अहमदनगरकवितानागपूरसाहित्यगंध
देवा तुला प्रार्थना; कुसुमलता वाकडे
0
4
8
2
9
7
देवा तुला प्रार्थना
गरीब कुटुंबाला एक झोपडी दे
हसतील त्यांना एक विसावा दे
ज्यांना शिक्षण महत्त्व कळले नाही
अशाना कळव त्यांना एक पाटी दे
अंधाना तु रस्ता दाखव
त्यांना होय आधाराची काठी दे
वंशाचा दिवा नको काय ते कामाचे
दोन्ही घर बघ एक गुणवंत लेक दे
मंदिरासमोर भिकारी नको बघ
अशाना शाळेचा रस्ता दाखवून दे
प्राणीमात्रावर हिंसा करू नये
अशाना दयेची सहानभूती दे
पांघरूण घाल देवा तुला प्रार्थना
सर्वाना सुखात ठेव सद्बुध्दी दे !!
कुसुमलता दिलीप वाकडे
दिघोरी,नागपूर
0
4
8
2
9
7



