Breaking
ई-पेपरकवितादेश-विदेशनागपूरपुणेमहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध

लेखणीच्या संगतीने

पांडुरंग एकनाथ घोलप

0 4 8 2 8 6

लेखणीच्या संगतीने

लेखणीच्या संगतीने
भाग्य माझे उजळले
शब्दांच्या या विश्वात
कवी मन माझे रंगले

भार झालासे हलका
आता माझ्या मनाचा
अर्थवाही लेखणीतून
शोध घेतो प्राक्तनाचा

लेखणी सोबती माझी
साकार केला विश्वास
जडला क्षणोक्षण आता
नवनिर्मितीचा हा ध्यास

बागडतो स्वच्छंद असा
मी सदा साहित्य प्रांती
प्रेरक ही लेखणी माझी
घडवते शब्दांनी क्रांती

लेखणीची संगत राहो
अभंग माझ्या जीवनी
वरदान लाभो ईश्वरा
अखंड नव संजीवनी

पांडुरंग एकनाथ घोलप
रोहोकडी, ता.जुन्नर, जि.पुणे
==========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 6

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे