Breaking
ई-पेपरकविताभंडाराविदर्भसाहित्यगंध

अडधडा

वनिता गभणे आसगाव भंडारा

0 4 8 2 4 4

अडधडा

गेला कोरडा मिरूग
बरसल्या अडधडा
शेत – शिवारातील
भर-भरल्या गळधडा

मोर नाचला रानात
कुणबी हसला मनात
काळी भुई वावराची
खेळे वाहत्या पाण्यात

ओले बिज भुईतील
आले फुलून वरती
शालू लेवून हिरवा
नाच – नाचली धरती

पिक डोलता शेतात
स्वप्न कुणब्याचे फुले
घाली साकळे देवाला,
“कर नभ आता खुले”

“हवाहवासाच येवो
हा अडधडाचा पाऊस
नको आणू महापूर
देवा एवढाच नवस”

वनिता गभणे
आसगाव भंडारा
========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 4 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे