Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरनांदेडमराठवाडासाहित्यगंध

स्वातंत्र्यदिन

बळवंत शेषेराव डावकरे ता.मुखेड, जि.नांदेड

0 4 8 2 9 0

स्वातंत्र्यदिन

ठेऊनी घरावर तुळशीपत्र
आयुष्याची केलीय होळी
मुक्त करण्या पारतंत्र्यातून
खाली वीरांनी छातीवर गोळी

जहाल मवाळ मतप्रवाहाने
सळो की पळो करुन सोडले
चले जावचा दुमदुमला नारा
क्रांतीकारकांनी रक्त सांडले

स्वातंत्र्यदिन उत्सव घरोघर
करु स्मरण वीर जवानांचे
बलीदानाने पावन झालेल्या
पवित्र आपल्या भारतभूचे

स्वातंत्र्य दिले मिळवून त्यांनी
सुख मात्र उपभोतोय आम्ही
फोफावलेल्या स्वैराचाराला
थोपवण्याची घेणार का हमी

देशभक्तीची ज्योत निरंतर
भारतीयांनो ठेवू प्रज्वलित
दहशतवादाला नको सहारा
एकात्मता राखुया अबाधित

बळवंत शेषेराव डावकरे
ता.मुखेड, जि.नांदेड

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे