बुधवारीय ‘काव्यरत्न’ स्पर्धेतील काव्यरचना
मुख्य संपादक व कार्यकारी संपादक

*✏संकलन, बुधवारीय ‘काव्यरत्न’ स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*‼मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘बुधवारीय काव्यरत्न’ कविता स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट काव्यरचना*‼
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट बारा🎗🎗🎗*
*🥀विषय : हुंकार🥀*
*🍂बुधवार : २८ / मे /२०२५*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*हुंकार*
तिच्या वेदनेचा हुंकार
कसा ,कुणा कधी कळला नाही ?
आत्मसन्मानावर होणारा घाव
तिच्या नशिबी टळला नाही..
ती साहत राहिली नितांत
स्वाभिमानावर होणारे बलात्कार
अन् चार भिंतीत कोंडले तिच्या
अस्तित्वाचे चित्कार…
कैक स्वप्न पाहिली तिने कितीदा
साजिऱ्या संसाराची…
चुरगाळून टाकली स्वप्न नियतीने
होळी सानुल्या सुखाची…
आयुष्याच्या पुस्तकातली
तिच्या मिटली रांगोळी..
लेकरासाठी वनवास नशिबी
देऊन का जीवास जाळी?..
घुसमटला जीव वेड्या जीवाचा
प्रेम हा असे गुन्हा अंतरीचा …
कितीदा अडला हुंदका तो
तिच्या असेल ओठी?
माहेराच्या नावासाठी का
मौनास घातली मिठी?
हुंकार तिच्या वेदनेचा हा
कोणी न पाही
नि:शब्द होती शब्द अन्
कंठ मुकाचं होई…
*सौ. सारिका मोरे*
*वाई, सातारा*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔥🟢🔥➿➿➿➿
*हुंकार*
किंकाळी घुमली नभी
घातला क्रुरतेने घाला
वेदनेचा हुंकार तिचा
हवेतच विरुन गेला
लेक वाचवा लेक शिकवा
ब्रीद आज रडते आहे
दिवसागणिक कन्येची
हत्या या डोळ्यांनी पाहे
अब्रुचे तिच्या हे धिंडवडे
सहन करती मुर्दाड मने
संपली का माणसातील
माणुसकीची कवने
षंड येथली शासनकर्ती
कायदाही पळवाट शोधतो
मौनातल्या त्या हुंकाराचा
आवाज अंतर्धान पावतो
करु नका तिची अवहेलना
द्या तिला वागणूक सन्मानाची
सून समजू लेकीसारखी
लक्ष्मी ती दोन्ही घरची
*श्री बळवंत शेषेराव डावकरे*
*मुखेड जिल्हा नांदेड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔥🟢🔥➿➿➿➿
*हुंकार*
संंघर्ष भीमराया,अन्याय विरुद्ध होता।
रुजवायला मानवता कटिबद्ध होता।।
विषमता विषारी,समाजात भोवली।
जहर शुध्दीसाठी,वचनबध्द होता।।
प्रज्ञासूर्य युगाचा,प्रकाशित होऊनी।
सुपुत्र अवनीचा सम्यक संबुध्द होता।।
कुप्रथा जातीभेदा,अनिष्ट अंधश्रद्धा।
उच्चाटन कराया,धैर्याने सिध्द होता।।
नांदाया सुखशांती, येथे अहिंसावादी
करुणेचा पुजारी,माणूस बुध्द होता।।
विज्ञान माणसाला,माणूस घडविते।
सत्यास जाणणारा, स्वयंसिद्ध होता।।
सिध्दांत बा भीमाचे,समाज उध्दाराचे।
युगप्रवर्तक झाला ,आहे प्रसिद्ध होता।
सन्मार्ग गौतमाचा,स्थापेल विश्वशांती।
समता बंधुत्वाचा,*हुंकार* शुध्द होता.
*गोवर्धन तेलंग*
*पांढरकवडा*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔥🟢🔥➿➿➿➿
*हुंकार*
नारीशक्ती अबोल नाही
लखलखणारी तलवार
लक्षात असूद्या कायम
सौदामिनीचा रुद्रावतार…
सहनशक्ती दुर्बलता नव्हे
डोळ्यात धगधगतो अंगार
माता बनून देई ऊब मायेची
अश्रूतून वाहतो शांत झंकार…
गर्भावस्थेपासूनच माऊली
रोज देते नवनवीन संस्कार
आईच्या कुशीत बाळ गिरवी
प्रेम वात्सल्य पहिला हुंकार…
नवनवीन नाते निभावते
स्पर्शात भक्कम आधार
मुखकमल हसरे नि सुंदर
अंतरी सोसून वेदना भार…
आदिशक्ती रणचंडी नारी
महिषासुरालाही केले ठार
थांबवा अन्याय अत्याचार
ऐका वेळोवेळी नारी हुंकार…
*राजश्री मिसाळ ढाकणे बीड*
*शिक्षिका, कवयित्री, हायकूकारा*
*©सदस्या – मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔥🟢🔥➿➿➿➿
*हुंकार*
खचू नको,रडू नको
भर हुंकार मनी
कर अन्यायाचा प्रतिकार
बन तू रणरागीनी
सासर असो वा माहेर
आहे तुझा अधिकार
शक्ती तुझी आहे अफाट
कर गनिमांचा संहार
किती चटके सोसले तरी
येणार ना तुझी दया
स्वार्थी,लोभी राक्षसांना
असते फक्त पैशाची हया
किती बळी जातील यात
करणार ना कुणी मोजमाप
सोन्यासारख्या जीवाला तू
का लावते ग गळफास
कुणाचं काय जातं
बाळ मात्र दीनवाणी
कसा आता ऐकेल तो
मातेची प्रेमळ वाणी
ऐका आता भगिनींनो
शक्ती,भक्ती एकवटू द्या
नका बनु कुणी वैष्णवी
संघर्षाने गुंता सोडवू या
*श्रीमती सुलोचना लडवे*
*अमरावती*
*©सदस्या,मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔥🟢🔥➿➿➿➿
*हुंकार*
वादळापरी धावणारा
तुझ्या ऊरीचा वेग मी
भावनांचा पूर घेऊनी
वाहणारी सरिता मी
दुभंगलेल्या मनसृष्टीचा
मनोव्यापार रेखीते मी
पेटलेल्या काळजाची
संजीवनीरुपी फुंकर मी
कविराज तुझ्या वेदनेच्या
हुंकारातूनच जन्मली कविता मी
*तारका रुखमोडे*
*अर्जुनी जि.गोंदिया*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔥🟢🔥➿➿➿➿
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपली छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ५.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*हुंकार*
एक नारी निघाली काम करून
रात्र फार हो झाली होती
लख्ख चांदण्याचा प्रकाश
अन भयाण शांतता पसरती….
काही नराधमांचा वावर होता
तो ही जनावरांच्याच मस्तीत
काढला माग त्या नारीचा
धूंद बेधूंद त्या काळ रात्रीत….
चेव चढला,भावना अनावर झाल्या
ताकदीतही फरक नराधमांच्या
गेले तिच्यावर धावून,ओरबाडू लागले
टाहो विरून गेला तोंडी त्याच नारीच्या…..
आक्रोश केला .गगनी ऊमटला
झोपली होती दुनिया गाढ स्वप्नात
नारीचा हुंकार,आक्रोश,टाहो सारे
दबत होते तिच्याच हुंदक्यात….
काही रात्रपाळीला होते चाललेले
काही रात्रपाळीहून होते आलेले
नुसतीच बघ्याची भूमिका सार्यांची होती
अहो,माणूसकी पार संपलेली होती..
*वसुधा वैभव नाईक*
*धनकवडी, जिल्हा- पुणे*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔥🟢🔥➿➿➿➿
*हुंकार*
पुस्तकांतली ती गोष्ट नव्हे,
ती रणांगणातली एक ज्वाला होते।
हुंकार होता तिच्या काळजात,
मृत्यूलाही हादरवणाऱ्या त्या हुंकारात।।
“मी झाशी देणार नाही!” — म्हणताच,
विझलेल्या आशा पुन्हा पेटल्या जणू क्षणातच।
हातात तलवार, डोळ्यात अंगार ,
राणीच्या हुंकाराने थरथरला दरबार।।
घोड्यावरती बाळ घेत धावली,
अखंड धैर्याची मूर्ती सावरली।
तिनं सांगितलं – स्त्री असो वा पुरूष,
न्यायासाठी उठणं हेच खरं माणूसपणाचं लक्षण विशेष।।
ती राणी होती, पण केवळ सिंहासनाची नव्हे,
ती रणरागिणी होती, अन्याय सहन न करणारी।
झाशीचा हुंकार अजूनही ऐकतो इतिहास,
तीच शिकवते — धैर्याने फोडा गुलामगिरीचा पाश।।
*सौ.मोनाली शिंदाडे*
*कर्वेनगर पुणे*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔥🟢🔥➿➿➿➿
*हुंकार*
हुंकार वेदनेचा कुणाला
का कधी कळला नाही
चिघळल्या जरी जखमा
तोल कधी ढळला नाही
घाव सोसले अगणित
झाले अनेकदा प्रहार
भार होता जाणीवांचा
काळजाकडे वळला नाही
अवघड मार्गी चालताना
धीर सारखा सुटत होता
क्षण असा नव्हता एकही
वाग्बाणांनी छळला नाही
सावध होती पाऊलेही
सन्मार्गावर चालताना
ठाऊक होते मनाला
धोका अजून टळला नाही
हिरवळ होती आयुष्यात
सदा फुलांनी बहरलेली
गळून पडलेल्या पानांचा
पाचोळाही वाळला नाही
माणसे जोडली नशीबाने
तडजोड केली सतत
हिम्मत होती मनगटात
ऊगाच कुणी भाळला नाही
वेदनांचा सांगाती झालो
झाली व्यथांची कसोटी
आयुष्याची परीक्षा झाली
निकालही चाळला नाही
*श्री.पांडुरंग एकनाथ घोलप*
*मु.पो.रोहोकडी,*
*ता.जुन्नर,जि.पुणे*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔥🟢🔥➿➿➿➿
*हुंकार*
प्रतिशोध घेण्या शत्रुचा
हुंकार भरावा लागणार
हुंकार असतो तयारीचा
शत्रूला परतून लावणार..१
युवका हुंकार भर या
समाजाला वाचविण्या
अंधश्रद्धा, बेरोजगारी,
महागाईला घालविण्या..२
छत्रपती शिवाजींचे
शस्त्र हुंकार युद्धात
जोश भरला जात
मावळ्यांच्या रक्तात….३
घालव हे भ्रष्टाचारी
राजकारण देशातून
युवका हो पाईक
देशाचा हुंकार भरून…४
हुंकार भरल्याशिवाय
खुमखुमी येत नाही
त्याशिवाय विजश्री
मिळवता येत नाही….५
पहेलगाम हल्ला झाला
हुंकाराचे बीज पेरायला
तुटून पडे देश पाकवर
खुमखुमी जिरवायला..६
*डॉ. बालाजी राजूरकर*
*हिंगणघाट, वर्धा*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔥🟢🔥➿➿➿➿
*हुंकार*
शोषित पिढीत समाजाला
तुम्ही न्याय मिळवून दिला,
अन्यायाला वाचा फोडण्या
बा भीमाने हुंकार मांडला…१
खुले करण्या चवदार तळे
फौज सारी चवदार संगरी
पाण्याचा हक्क अधिकार
मिळवण्या पाण्यात उतरी…२
घोषणा केली धर्मांतराची
येवले मुक्कामी सभेमधी,
दिक्षा दिली बुध्द धम्माची
नागपूर पावन भुमिमधी…३
नाशिक काळाराम मंदिर
सर्वासाठीच मोकळे केले,
माणसाला माणूस म्हणून
समानतेचे अधिकार दिले…४
हुंकार मांडला तो वेदनेचा
जुमानले नाही विरोधाला,
पेटून उठले अन्यायविरुद्ध
संघर्षमय लढा उभारीला…५
*बी एस गायकवाड*
*पालम, परभणी*
*©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔥🟢🔥➿➿➿➿
*हुंकार*
तुझ्या प्रत्येक समस्येवर,
मी भरते हुंकार….,
देते अवधान,तुझ्या प्रश्नाकडे,
नसतो माझ्याकडे,कधीच नकार…!
जीवन रथाची,आपण दोघे,
आहोत सख्या,चाके दोन…,
हुंकार-नकाराच्या,आईस्क्रीमचे,
जणू आपण,चवीष्ट कोन….!
कितीही होवो,गरम वातावरण,
प्रश्नांचा असो, कितीही भडीमार…,
हुंकारा मध्ये,आहे ताकद,
वातावरण गरम,होते गार…!
नकारात्मकतेच्या,अमाप पिकात,
सकारात्मकता,नाही हरवणार…,
माझ्या सकारात्मक हुंकाराने,
आपले जीवन फुलवणार…!
एकमेकांच्या बोलण्याकडे आपण,
देतो अवधान हुंकार…..,
चुटकीसरशी सुटतात प्रश्न,
जीवनांगणी बहरते बहार….!!!
जीवनांगणी बहरते बहार….!!!
*कवी श्री.मंगेश पैंजने सर,*
*ता.मानवत,जिल्हा-परभणी,*
*© सदस्य, मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿🔥🟢🔥➿➿➿➿
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन* 🌺
*सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖





