मागासवर्गीय कर्मचा-यांना पदोन्नतीत आरक्षण द्या; आकाश पाटील यांची मागणी
कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे जिल्हा सरचिटणीस यांनी मांडली शिक्षकांची व्यथा
मागासवर्गीय कर्मचा-यांना पदोन्नतीत आरक्षण द्या; आकाश पाटील यांची मागणी
कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे जिल्हा सरचिटणीस यांनी मांडली शिक्षकांची व्यथा
वर्धा जिल्ह्यातील शाळा ‘लॉकडाऊन’
आक्रोश विराट मोर्चात शेकडो शिक्षकांचा सहभाग
जिल्हा प्रतिनिधी वर्धा
बिनधास्त न्यूज नेटवर्क
वर्धा: आज आयोजित सर्व शिक्षक कृती समितीने पुककरलेल्या एक दिवसीय मोर्चात मनोगत व्यक्त करताना कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे जिल्हा सरचिटणीस आकाश पाटील म्हणाले की, ‘शिक्षकांना खेड्या पाड्यात राहायला घर किरायाने मिळत नाही. त्यामुळे मुख्यालयी राहण्याची अट रद्द करण्यात यावी’. दि 15मार्च 2024 चा व 5 सप्टेंबर 2024 चा जीआर रद्द करण्यात यावा, विषय शिक्षकांना सरसकट वेतनश्रेणी लागू करण्यात यावी, इतर राज्याप्रमाणे 2017 पासून रद्द केलेले पदोन्नतीत आरक्षण लागू करण्यात यावे, सरसकट सर्व शिक्षकांना 10-20-30 ची आश्वाशीत प्रगती योजना लागू करण्यात यावी, मुलींचा उपस्थिती भत्ता 1 रुपयावरून 10 रुपये करण्यात यावा अशी मागणी करत आपली व्यथा मनोगतातून मांडली.
वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या आक्रोश मोर्चात राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने दिनांक 15 मार्च 2024 चा संच मान्यतेचा अन्यायकारक शासन निर्णय, 5 सप्टेंबर2024 चा विद्यार्थी पटसंख्येचा शासननिर्णय , मागासवर्गीय कर्मचा-यांचा पदोन्नतीतील आरक्षण, रद्द करणे 10-20-30 चा आस्वासित प्रगती योजना लागू करणे,सरसकट सर्व शिक्षकांना वरिष्ट श्रेणी लागू करणे आदी मागण्यासह निदर्शने करण्यात आली.
याप्रसंगी शिक्षकांनी सरसकट जुनी पेन्शन योजना लागू करणे,समान काम- समान वेतन या धोरणानुसार सर्व विषय शिक्षकांना वेतन श्रेणी लागू करणे, अनुकम्पा तत्व वरील शिक्षकांना Tet अनिवार्य तेचा शासन निर्णय रद्द करणे,मुख्यालयी राहण्याची अट रद्द करणे,प्राथमिक शिक्षकांना रजा रोखीकरण लागू करणे, कंत्राटी धोरण रद्द करणे, सर्व विद्यार्थ्याना मोफत व सक्तीचे दर्जेदार शिक्षण पुरविणे व त्याकरिता सोयीसुविधा उपलब्ध करून देणे आदी सह विविध मागण्यांसाठी सर्व प्राथमिक शिक्षक कृती समितीतर्फे मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.