Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरकविताचारोळीनागपूरपरीक्षण लेखबीडब्रेकिंगमराठवाडामहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध

मराठीचे शिलेदार समूहासाठी ऋणाभाराचे शब्दपुष्प; राजश्री ढाकणे

राजश्री मिसाळ ढाकणे बीड शिक्षिका, कवयित्री, हायकूकारा सदस्या - मराठीचे शिलेदार समूह

0 4 8 2 8 2

मराठीचे शिलेदार समूहासाठी ऋणाभाराचे शब्दपुष्प; राजश्री ढाकणे

जादुई मेसेज तीन शब्दांचा
पानगळ सर्वोत्कृष्ट स्थानी
ऋणाभाराचे शब्दपुष्प अर्पिते
शिलेदार परिवाराच्या चरणी..!”

सर्वांना सस्नेह नमस्कार. काल दिनांक -10-02-2026 ला माझी “चित्रचारोळी -पानगळ” या रचनेची आजची “सर्वोत्कृष्ट चित्रचारोळी”या नावीन्यपूर्ण उपक्रमांतर्गत निवडून लेखणीला सन्मानित केल्याबद्दल मी सर्वप्रथम आपले सर्वांचे ऋणाभार व्यक्त करण्याआधी थोडेसे मनातले भाव आपल्यासाठी.

“तुमचा फोटो पाठवा” हाच तो तीन शब्दांचा जादुई मेसेज जेव्हा दादांचा येतो ना… काय तो अवर्णनीय आनंद गगनात मावत नाही…मग उत्कंठा शिगेला पोहोचते आणि शोध सुरू न होतो कुठं आपलं सर्वोत्कृष्ट रचनेचं पोस्टर आलं असेल..! चारोळी,चित्र चारोळी, हायकू, त्रिवेणी, बालकाव्य की कविता मनाचा तर्क सुरू अंतर्मन आणि बाह्यमन यांच्यात…दोघांत पैज लागते “आजचे उत्कृष्ट काय असेल ओळखायला तीन संधी… आणि काय आश्चर्य पहिल्याच संधीत “सर्वोत्कृष्ट रचनेचं पोस्टर दिसतं मग तर काय आणखी दुधात साखर पडल्यासारखं आणि त्याहूनही दुर्मिळ दुग्धशर्करा योग म्हणजे रचना लिहितानाच आपलं आपल्याला वाटणं की ही रचना”सर्वोत्कृष्ट म्हणून सन्मानित ” केली जाईल आणि अगदी मनकवड्या मनाचा विजय व्हावा म्हणजे आनंद तीपटीने वाढतो. असे शेकडो सन्मान देऊन चेहऱ्यावर आनंद फुलविणारा माझा शिलेदार परिवार अख्या विश्वात शोधूनही सापडणार नाही…!

पण कधी कधी सर्वोत्कृष्ट निवड करूनही कुठल्या तरी व्यापात अडचणीत /तब्येतीमुळे मी “ऋणाभार मनोगत ” पाठवू शकत नाही किंवा फोटो पाठवायचा राहून जातो याचं शल्य मनाला नेहमीच टोचत राहतं. कारण शिलेदार परिवारातील प्रत्येक प्रशासक सहप्रशासक /संकलक /परीक्षक संपादक आणि आ. राहुल दादा यांच्या कष्टाची जाणीव मला नेहमीच राही इथे लाखो साहित्यिक घडले आहेत पुढेही घडतील. सातासमुद्रापार पोहोचलेला हा शिलेदार परिवार माय मराठीसाठी तन मन धनाने आणि तळमळीने कार्य करत आहे. माय मराठीला अभिजात दर्जा मिळवण्यासाठी दादांच्या अथक परिश्रमाला फळ लाभले आहे…!

आताच आ राहुल दादांना त्यांच्या मराठी साहित्यिक कार्यासाठी आणि सर्वोत्कृष्ट पत्रकारिता कार्यामुळे “प्रसिद्ध साप्ताहिक महाराष्ट्र सपूतच्या “वर्धापन दिनी “पत्रकार रत्न “या बहुमोल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आपल्या शिलेदार परिवासाठी नक्कीच अभिमानास्पद.. गौरवास्पद.. कौतुकास्पद हा पुरस्कार आहे. आ. राहुल दादा आपल्या दैदीप्यमान कार्यासाठी असे लाखो पुरस्कार दिले तरी कमीच पडतील असे आपले असाधारण…देवावतारी कार्य मी गेले सात वर्षांपासून जवळून बघितले आहे. अगदी सोशल मीडियावर करोडो लोकांपर्यंत पोहोचले आहे… आपल्या कार्यास उदंड निरोगी दीर्घायुष्यासाठी अनंतकोटी शुभेच्छा…!

आता वेळ ऋणाभाराची…! सर्वप्रथम या शिलेदार परिवाराचे सर्वेसर्वा लाखो व्यक्तींना साहित्यिक बनवणारे, माय मराठीसाठी आपला प्रत्येक श्वास घेणारे…ध्येयवेडे आणि कुशल संस्थापक, संपादक, नावीन्यपूर्ण स्पर्धेचे मुख्य आयोजक, देवांश म्हणजे आपले आ. राहुल दादा पाटील, सावली सारखी अहोरात्र साथ देणाऱ्या आ. सौ. पल्लवीताई, मुख्य प्रशासक /परीक्षक /कार्यकारी संपादक माझी सखी सौ.सविता पाटील ठाकरे, आ. प्रशांत भाऊ ठाकरे,हायकू काव्याचे मुख्य परीक्षक आ. विष्णुदादा, आ.संग्राम दादा, आ. अशोक दादा, आ.अरविंद दादा, चित्रचारोळी स्पर्धेच्या मुख्य परीक्षक म्हणजेच माझी सखी सौ. स्वाती मराडे,त्रिवेणीच्या मुख्य परीक्षक प्रिय आ. वृंदाताई, माझ्यासाठी अभिमानास्पद अशी सखी शर्मिला ताई, प्रिय सखी तारकाताई, प्रिय सखी प्रतिमा ताई… साप्ताहिक साहित्यगंधचे सर्व संपादक मंडळ… अगदी सर्वांचे मनःपूर्वक ऋणयुक्त अनंत धन्यवाद. माझ्या लेखणीवर कौतुकाचा वर्षाव करणारे… अर्थात लेखणीची ताकद /बळ असणाऱ्या शिलेदार परिवारातील सर्व आ. दादा /ताईंचे मनःपूर्वक खूप खूप ऋणयुक्त अनंत धन्यवाद.! सर्वांच्या साहित्यिक प्रवासास अभिनंदनीय शुभेच्छा…!!!.

राजश्री मिसाळ ढाकणे बीड
शिक्षिका, कवयित्री, हायकूकारा
सदस्या – मराठीचे शिलेदार समूह

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 2

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे