Breaking
आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजननागपूरमहाराष्ट्रविदर्भ

मालेवाडा येथे ७८ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा.

रजत डेकाटे भिवापूर/मालेवाडा

0 4 8 3 0 0

मालेवाडा येथे ७८ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा.

रजत डेकाटे भिवापूर/मालेवाडा

नागपूर: भिवापूर पंचायत समिती अंतर्गत येत मालेवाडा येथील ग्रामपंचायत कार्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून ग्रामपंचायत कार्यालयात उपसरपंच फुलचंद मेश्राम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.तर जिल्हा परिषद शाळेत शाळा व्यवस्थापन समितीच्या निर्णयानुसार १२ वीत ७७पॉईंट५० टक्के गुण प्राप्त केलेल्या साक्षी लोनगाडगे या विद्यार्थ्यीनीच्या हस्ते शाळेत ध्वजारोहण करण्यात आले. शाळेच्या वतीने साक्षी लोनगाडगे या विद्यार्थ्यीनीच शाळेच्या माध्यमातून सत्कार करण्यात आला.

यावेळी तिरंगा प्रतिज्ञा, निपुण भारत प्रतिज्ञा घेतली गेली. विद्यार्थ्यांनी अनेक देशभक्ती गीत सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका शिला रोडे मॅडम यांनी तर सूत्रसंचालन शिक्षिका वर्षा चापले मॅडम यांनी तर आभार शिक्षिका कश्यप मॅडम यांनी मानले.शाळेतील शिक्षक सुरज येल्ले सर, शिक्षिका भुमेश्वरी सातपुते मॅडम, ग्रामपंचायत सरपंच्या राखी इंगोले, ग्रामसेवक सुनिल तायवाडे साहेब,शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा स्वाती सहारे उपाध्यक्ष विलास मेश्राम, प्रतिष्ठत नागरिक राजु पसारे,तंटामुक्त समितीचे अध्यक्ष यशवंत सातपुते, ग्रामपंचायत सदस्य मनोहर वानखेडे, दिनेश सहारे, मंगेश तळणकर, रेखा येसणसुरे,दुर्गा सहारे, स्मिता बावणे, ज्ञानवंती ढुमणे,मंदा क्षीरसागर,पोलिस पाटील इंदु गेडाम, अंगणवाडी सेविका रंजना गेडाम, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी विकास गोवारदिपे व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 3 0 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे