Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजननागपूर

सिर्सी येथे ‘श्री शिवमहापुराण कथा’ व भव्य यात्रा महोत्सवाचे आयोजन

अखिल रोडे प्रतिनिधी

0 5 1 7 5 8

सिर्सी येथे ‘श्री शिवमहापुराण कथा’ व भव्य यात्रा महोत्सवाचे आयोजन

​८ मार्चपासून ज्ञानयज्ञाला प्रारंभ; संत रंगनाथ बाबा पुण्यस्मरणोत्सवाचे ४२ वे वर्ष

अखिल रोडे प्रतिनिधी

उमरेड/ ​सिर्सी (प्रतिनिधी): येथील संपूर्ण सिर्सीवासी गावकऱ्यांच्या सहकार्याने परमहंस श्री संत रंगनाथ बाबा यांच्या पुण्यस्मरणोत्सवानिमित्त ‘शिवमहापुराण कथा सप्ताह’ आणि ‘भव्य यात्रा महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. यंदा या महोत्सवाचे ४२ वे वर्ष असून, सोमवार दिनांक ८ मार्च २०२६ पासून या धार्मिक कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे.

​धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल:
सप्ताहाचा प्रारंभ फाल्गुन कृष्ण ५, रविवार ८ मार्च रोजी होईल. या काळात दररोज पहाटे ५ ते ६ काकडा भजन, सकाळी ७ ते ८ ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, सकाळी ८:३० ते ११:३० शिवमहापुराण कथा, दुपारी १२ ते २ भजन, सायंकाळी ६ ते ७ हरिपाठ आणि रात्री ८ ते ११ पुन्हा शिवमहापुराण कथा असे भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

​विद्वान वक्त्यांची उपस्थिती:
या ज्ञानयज्ञात शिवमहापुराण कथेचे निरूपण ह.भ.प. नरेशजी महाराज निंबेकर (मु. लाखणी, जि. भंडारा) हे आपल्या रसाळ वाणीतून करणार आहेत. तसेच ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व्यासपीठ ह.भ.प. विलास महाराज सोनवणे भूषविणार असून, हरिपाठाचे विणेकरी म्हणून ह.भ.प. हर्षल महाराज सेवा देणार आहेत.
​विशेष आकर्षण व शोभायात्रा:
या महोत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे ‘राधे-राधे कला मंडळ, सासरा (सानगडी)’ यांची कृतीमय बोलकी झाकी असणार आहे. सोमवार १६ मार्च रोजी सकाळी ७ वाजता संत रंगनाथ बाबांची पालखी सोहळा व भव्य शोभायात्रा निघणार आहे. यामध्ये सिर्सीचे प्रसिद्ध ‘D.N.A. लेझीम पथक’, जयलक्ष्मी बँड पार्टी आणि विविध भजन मंडळी सहभागी होणार आहेत.

​महाप्रसाद व सांगता:

सोमवार १६ मार्च रोजी दुपारी १ ते ४ या वेळेत ह.भ.प. नरेशजी महाराज निंबेकर यांचे ‘गोपाल काल्याचे कीर्तन’ होईल. त्यानंतर सायंकाळी भव्य ‘महाप्रसादा’चे आयोजन करण्यात आले असून, सर्व भाविकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री संत रंगनाथ बाबा व सिर्सी ग्रामस्थ नागरिक मंडळींनी केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 1 7 5 8

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे