Breaking
ई-पेपरकवितादेश-विदेशधाराशिवनागपूरमराठवाडामहाराष्ट्रविदर्भ

गुरु महिमा

दत्ता काजळे (ज्ञानाग्रज)

0 4 8 2 9 4

गुरु महिमा

अज्ञानाचा अंध:कार
दूर सारितो हा गुरु
पथदर्शी स्तंभासम
कार्य अव्याहत सुरू ॥

ध्यास शिक्षणाचा त्याला
करी सदैव अस्वस्थ
विद्यार्थी विकासातच
राही नेहमीच व्यस्त ॥

नित्य आव्हानांचा करी
अग्रणीने परिपोष
विद्यार्थ्यांना ज्ञानदान
हेच वैशिष्ट्य विशेष ॥

गुरु महिमा असती
जाणावया थोर फार
सेवाव्रत भावनेचा
उत्तुंग तो अविष्कार ॥

ऐसी वर्णितो महिमा
आज शिक्षक दिनाला
ज्ञानाग्रज हा वंदितो
समस्त गुरुजनांला ॥

दत्ता काजळे (ज्ञानाग्रज)
तुरोरी जि.धाराशिव
=========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे