0
4
8
2
9
0
जीवनरूपी रंगभूमी
मानवजन्म लाभला तुला भला
तुझी ही जीवनरूपी रंगभूमी
तीन अंकी नाटक होते
फिरूनी पुन्हा याच जन्मी ||१||
रंगभूमी तुझ्या आयुष्याची
तू साकारतोस अनेक पात्रे
रिकाम्या हाती आलासी
जाणारही रिकाम्या हाते ||२||
जीवनरूपी या रंगभूमीवर
किती बदलती वेशभूषा
उण्यापुऱ्या आयुष्यातही किती
तुझ्या आशा आणि निराशा ||३||
करीसी अभिनय बेमालूम
संवादांची जंत्री मोठी
सुखदुःखाच्या अनंतराशी
तरीही जीवनगाणे ओठी ||४||
बालपण देगा देवा म्हणतो
तारुण्याचा तुलाच हव्यास
म्हातारपण येता जवळी
का रे मग होतो उदास ||५||
रंगभूमी ही तुझी मानवा
नाटकरूपी कथा रंगवी झकास
पडद्यामागचा नाटककार तो
विधात्याचा लेखणीवर ठेव विश्वास ||६||
या जीवन रूपी रंगभूमीचा
तू असशी खरा कलाकार
सुख दुःख वाट्याला येतील
कर हसतमुखाने स्वीकार ||७||
पांडुरंग एकनाथ घोलप
ता.कर्जत जि.रायगड
0
4
8
2
9
0



