0
4
0
9
0
3
मृगधारा
मृगधारा बरसू लागल्या
धरणीमाता सुखावली,
अलवार त्या धारांना
कुशीत आपल्या घेती झाली ..!!१!!
जमिनीची मशागत करून
शेतकरी करती पेरणी,
मृगसरी कोसळल्या की
कोंब हळूच येई वरती..!!२!!
मातीला मिळतो सुगंध
झाडे वेली रान सारे,
चोहीकडे पसरला आनंद
काळ्या आईचे रुप खरे…!!३!!
विहिरी, नाले तुडुंब भरून
नदी सागराचे मिलन,
पहाटे गार गुलाबी वारा
प्रफुल्लीत करतो आसमंत सारा…!!४!!
अर्चना राजू ईंकने
आरमोरी,जि.गडचिरोली
=======
0
4
0
9
0
3





