‘गणेश पाटील’ शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम
जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण
‘गणेश पाटील’ शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम
नंदूरबारच्या वल्लभ विद्यामंदिर पाडळदा येथे पर्यवेक्षक म्हणून कार्यरत
जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण
जिल्हा प्रतिनिधी, नंदूरबार
नंदूरबार: राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे आयोजित शैक्षणिक वर्ष सन २०२३-२४ दरम्यान SCERT, पुणे द्वारा तालुका, जिल्हा व राज्यस्तरावर शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती स्पर्धा घेण्यात आली होती. त्यात नूतन विद्याप्रसारक मंडळ संचलित वल्लभ विद्यामंदिर पाडळदा ता.शहादा जि.नंदुरबार या शाळेचे पर्यवेक्षक ‘गणेश पाटील’ यांना इयत्ता ६ वी ते ८ वी तसेच इयत्ता ९ वी १० वी या दोन्ही गटातून शहादा तालुका स्तर तसेच जिल्हा स्तरावर दोन्ही व्हिडीओस प्रथम क्रमांकाचे पारितोषिक जाहीर झाले आहेत.
भूगोल विषयाचे कृतीयुक्त शिक्षण या संकल्पनेवर आधारित ‘आंतरराष्ट्रीय वार रेषा ‘ तसेच ” चंद्राची गती, चंद्रकला, चंद्रग्रहण व सुर्यग्रहण ” आदी संकल्पाना स्पष्ट करणारे दोन्ही व्हिडीओ होते. दोन्ही व्हिडीओ प्रत्यक्षात वर्गाध्यापन करुन तयार केले. नुकताच या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून या दोन्ही शैक्षणिक व्हिडीओस तालुका तसेच जिल्हा पातळीवर प्रथम क्रमांकाचे पारितोषिक जाहिर झाले आहेत.
तालुका स्तरावर (३०००) तीन हजार रूपये व प्रमाणपत्र, तर जिल्हास्तरावर दहा हजार रूपये (१०,०००) सन्मानचिन्ह प्रमाणपत्र असे दोन्ही पुरस्काराचे स्वरुप असणार आहे.
मिळालेल्या या यशाचे मा.चेअरमन श्री दत्तात्रय सोमजी पाटील मा व्हा. चेअरमन श्री विजय लिमजी पाटील सचीव डाॅ.विलास पाटील ज्येष्ठ संचालक श्री रमेशभाई शंकर चौधरी माजी मुख्याध्यापक संचालक श्री अशोक उत्तम पाटील तसेच सर्व संचालक यांनी तसेच ,शिक्षण विस्तार अधिकारी, गट शिक्षणाधिकारी , केंद्रप्रमुख श्री रविंद्र लामगे, डायटचे प्राचार्य व अधिव्याख्याते,तसेच वल्लभ विद्यामंदिर शाळेचे मुख्याध्यापक श्री अंबालाल चौधरी सर्व शिक्षक वृंद , आदर्श प्राथमिकचे मुख्याध्यापक योगेश सोनार व शिक्षकवृंद यांनी अभिनंदन केले आहे. नंदूरबार सारख्या जिल्ह्याचे नाव शैक्षणिक क्षेत्रात गाजत असल्याने शहरात व तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, गणेश पाटील यांचे सर्वत्र कौतुक केल्या जात आहे.