जि.प. प्रा शा उक्कलगाव येथील दिंडी सोहळ्यात अवतरली पंढरी
गावक-यांच्या सहकार्याने उक्कलगाव भक्तीरसात न्हाऊन निघाले
जि.प. प्रा शा उक्कलगाव येथील दिंडी सोहळ्यात अवतरली पंढरी
गावक-यांच्या सहकार्याने उक्कलगाव भक्तीरसात न्हाऊन निघाले
जिल्हा प्रतिनिधी, परभणी
परभणी: आषाढी एकादशीच्या निमित्ताने मानवत तालुक्यातील मौजे उक्कलगाव येथे गावकरी भजनी मंडळ शिक्षण प्रेमी नागरिक व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उक्कलगाव येथील सर्व विद्यार्थी शिक्षक बंधू भगिनी यांनी मिळून आज दि (१७ जुलै) रोजी दिंडी सोहळ्याचा आनंद घेतला.
दरवर्षीप्रमाणे गावातील भजनी मंडळ श्री माणिकराव पिंपळे श्री रंगनाथराव पिंपळे श्री कमलाकर कुलकर्णी श्री मारोती पिंपळे श्री अंकुशराव पिंपळे व श्री शास्त्रीजी यांच्या भजनी मंडळासह विठ्ठल रुक्मिणीच्या वेशात असलेले विद्यार्थी कलश घेऊन आलेल्या विद्यार्थिनी टाळ पताका घेऊन आलेले विद्यार्थी व गावकरी मोठ्या आनंदाने दिंडीमध्ये सहभागी झाले.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उक्कलगाव येथे प्रथम पालखीचे पूजन शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ सिंधुताई धुराजी उक्कलकर उपाध्यक्ष श्री अंकुश अमृतराव पिंपळे शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती मायादेवी गायकवाड व भजनी मंडळाच्या हस्ते संपन्न होऊन दिंडीला सुरुवात झाली…
आषाढी एकादशीनिमित्त निघालेल्या दिंडीमध्ये श्री उत्तम भाऊ पिंपळे , श्री लक्ष्मणराव (जिजा) पिंपळे सरपंच श्री उत्तमराव गायकवाड, यांच्यासह श्री मधुकरभाऊ पिंपळे श्री रमेशराव पिंपळे श्री मुंजाभाऊ पिंपळे श्री चंद्रकांत पिंपळे श्री लक्ष्मणराव पिंपळे श्री बालाजीराव पिंपळे श्री बालासाहेब टाकळकर श्री दत्तराव पिंपळे श्री सुखदेव पिंपळे व महिला भगिनी मोठ्या संख्येने सहभागी होत्या.
या दिंडी सोहळ्यात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. दिंडी मार्ग सडा रांगोळींनी सुशोभित करण्यात आला होता ठीक ठिकाणी गावकरी व बाल वारकरी पावली खेळणे टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये फुगडी खेळणे याचा आनंद घेत होते. उक्कलगाव येथील ग्रामदैवत मारोती मंदिरा मागील भव्य पटांगणामध्ये दिंडी आल्यानंतर मोठे रिंगण करण्यात आले. गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी रिंगणाचा पावलीचा व फुगडीचा आनंद घेतला..
आषाढी एकादशीचे औचित्य साधून शाळेतील विद्यार्थिनींनी भक्ती गीतावर नृत्य सादर करत सर्व वातावरण भक्तिमय केले.
कार्यक्रमाच्या शेवटी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उक्कलगाव येथे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष धुराजीराव पिंपळे, उपाध्यक्ष श्री अंकुश अमृतराव पिंपळे सदस्य श्री मधुकर भाऊ पिंपळे श्री लक्ष्मण भाऊ पिंपळे व शाळेतील शिक्षक श्री योगेश देशमुख सर यांनी सर्व विद्यार्थी व गावकऱ्यासठी अल्पोपहाराची व्यवस्था केली.
शाळेला गावाचा आधार असावा व गावाला शाळेचा अभिमान असावा या उक्तीप्रमाणे सर्व गावकरी व शाळेतील विद्यार्थ्यांसह शिक्षक बंधू भगिनी मोठ्या उत्साहाने आषाढी एकादशीनिमित्त होणाऱ्या दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी झाले व अवघे उक्कलगाव चैतन्याने फुलून गेले. शेवटी शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ सिंधुताई धुराजी उक्कलकर व उपाध्यक्ष श्री अंकुश अमृतराव पिंपळे व मुख्याध्यापिका श्रीमती मायादेवी गायकवाड यांनी सहभागी सर्व गावकऱ्यांचे आभार मानले.