
0
4
0
9
0
3
समाजात मी
मी अंश या देशाची
गंधाळलेल्या या मातीची
एकरूप मी सहज
विरघळते कणाकणांनी
मिसळू पाहते इथल्या
शुध्द ताज्या हवेत
पण साहस होत नाही
एक जीव प्राण होण्याची
होता येईल का पुष्प कधी
बसेन बोलत भुंग्याशी
मैत्री करावी वाटते कधी
उंच जाणाऱ्या वेलींशी
मिसळावे वाटते होत लहान
बालकांच्या मुक्त हास्यात
खेळता वाटे शोधावे
कुतूहल त्यांच्या नजरेतले
कधी होऊन सेवक
करावी सृषूशा रूग्णांची
हात धरावे वृद्धाचे
बसावे त्यांच्या पायाशी
जपावे या अवनीला
सुजलाम सुफलाम धरणीला
समाजात मी अशी मुरावे
जसे पाणी मूरते मातीला
सविता धमगाये
जि.नागपूर
===========
0
4
0
9
0
3





