सिर्सी चा लाडका ‘अवलिया’ हरपला! विहिरीत पडून ‘अज्जा’चा दुर्दैवी अंत
सिर्सी (प्रतिनिधी): अखिल रोडे
सिर्सी चा लाडका ‘अवलिया’ हरपला! विहिरीत पडून ‘अज्जा’चा दुर्दैवी अंत
बेला पोलिसांकडून नातेवाईकांचा शोध सुरू
सिर्सी (प्रतिनिधी): अखिल रोडे
उमरेड/ सिर्सी: (दि १२) गेल्या अनेक वर्षांपासून सिर्सी येथील स्मशान घाटावर वास्तव्यास असलेल्या आणि संपूर्ण गावाचा लळा लावलेल्या *’अज्जा’* नावाच्या अवलियाचा आज विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाला. एका निरागस आणि कोणालाही त्रास न देणाऱ्या व्यक्तिमत्त्वाचा असा अंत झाल्याने सिर्सी गावावर शोककळा पसरली आहे. दरम्यान, बेला पोलीस आता त्यांच्या वारसांचा किंवा नातेवाईकांचा शोध घेत आहेत.
*गावकऱ्यांच्या गराड्यात रमणारा ‘अज्जा’*
अज्जा हे काहीसे वेडसर असले तरी अत्यंत शांत स्वभावाचे होते. ते कोणाकडेही काही मागत नसत, मात्र गावकरी त्यांना आपुलकीने खाऊ-पिऊ घालत. गावातील बंडू डाखोळे, राजू रोडे , गजू राणे, देवा लांडगे, महादेव चिंचुलकर, नाना शेंडे , मनोज भल्लावी, प्रभाकर वाकडे , मनोहर वाकडे, कमलेश वाकडे, आणि सुरेश वाघडे यांच्याकडे अज्जा नेहमी आवडीने जाऊन बसायचे. भावरावजी चाय वाले आणि शिवा गावंडे यांच्या चाय टपरी वर जाऊन चाय प्यायचा या व्यक्तींच्या सहवासात त्यांना जणू आपलेपण मिळत असे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांशी अज्जांचे एक अनाम नाते तयार झाले होते.
बेला पोलिसांचे आवाहन
अज्जा यांचा अपघाती मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली असून, त्यांचे मूळ गाव किंवा नातेवाईक कोण आहेत, याचा शोध बेला पोलीस घेत आहेत. ज्या कोणाला या व्यक्तीबाबत काही माहिती असेल किंवा त्यांच्या नातेवाईकांना ओळखत असतील, त्यांनी तात्काळ बेला पोलीस स्टेशन, तालुका उमरेड (नागपूर) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
गावात अनेक दशके वावर असलेल्या या माणसाचे स्मशानभूमी हेच घर होते आणि आज दुर्दैवाने त्याच ठिकाणी त्यांच्या आयुष्याची अखेर झाली. एका निस्वार्थी जिवाच्या जाण्याने सिर्सीकरांनी आपला
‘ अज्जा’ गमावल्याची भावना व्यक्त केली आहे.



