Breaking
ई-पेपरकवितासांगलीसाहित्यगंध

प्रेमरहस्य

वृंदा (चित्रा) करमरकर ता. जिल्हा सांगली

0 6 3 9 6 5

प्रेमरहस्य

प्रेमरहस्य कुणा न कळले
कधी कुणा ना उलगडले
प्रेमाचे ऐसे आदिम कोडे
कुणीच ना कधी सोडवले

फुलात सुगंध कसा वसतो
चांदणी सवे चंद्र शोभतो
किनारा लाटांना स्पर्शतो
कमलिनीत भृंग गुंततो

मेघ धरणीला भेटताना,
तृप्त माती दरवळताना,
थेंबाथेंबांतून प्रेम फुलते
हिरव्या अंकुरांतून हसते

शब्दांपलीकडचे नाते
मौनामधुनी व्यक्त होते,
डोळ्यांत दाटलेल्या भावनांना
अश्रूंची मग भाषा लाभते

कधी विरहात प्रेम फुलते,
कधी प्रतीक्षेत आयुष्य झुरते,
मिळण्यातच प्रेम नसते,
हरण्यातही कधी ते उरते

 

वृंदा (चित्रा) करमरकर
ता. जिल्हा सांगली
========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 3 9 6 5

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे