शिवसेना ओबीसी विभागाच्या नागपूर, हिंगणा विधानसभा कार्यकारणीत फेरबदल; नव्या नियुक्त्या जाहीर
प्रतिनिधी :-अखिल रोडे

शिवसेना ओबीसी विभागाच्या नागपूर, हिंगणा विधानसभा कार्यकारणीत फेरबदल; नव्या नियुक्त्या जाहीर
प्रतिनिधी :-अखिल रोडे
नागपूर शहर
बिनधास्त न्यूज नेटवर्क
नागपूर / बुट्टेबोरी : (दि ३०) – शिवसेना (शिंदे गट) ओबीसी विभागाने संघटन अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने नागपूर जिल्हा आणि हिंगणा विधानसभा क्षेत्रात महत्त्वपूर्ण नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या निवडी करण्यात आल्या असून, यामुळे जिल्ह्यात शिवसेनेचे संघटन अधिक आक्रमक होणार असल्याचे चित्र आहे.
पूर्व विदर्भ अध्यक्ष प्रवीण कळंबे यांच्या मार्गदर्शनात आणि नागपूर जिल्हाध्यक्ष गुणवंत तपासे यांच्या नेतृत्वात या नियुक्त्यांचे पत्र अधिकृतपणे प्रदान करण्यात आले. ओबीसी समाजाच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि तळागाळातील कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी या निवडी महत्त्वपूर्ण मानल्या जात आहेत.
नवनियुक्त पदाधिकारी खालीलप्रमाणे:
या निवडीमध्ये अनुभवी आणि जनसंपर्क असलेल्या कार्यकर्त्यांना संधी देण्यात आली आहे:
जिल्हा सचिव: अनिल गोलकुंटवार
हिंगणा विधानसभा अध्यक्ष: शरद ठाकरे
नागपूर जिल्हा संघटक: विक्रांत चापले
तालुका संघटक (नागपूर ग्रामीण): दादाराव उईके
तालुकाध्यक्ष: महेश मल्लेवार
विभाग अध्यक्ष: मोहन चौधरी
तालुका सहसंघटक: सचिन गिरसावळे (रामा)
”संघटन मजबूत… लढा अधिक आक्रमक!” या ब्रीदवाक्याला अनुसरून आगामी काळात ओबीसी समाजाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. या नियुक्त्यांमुळे नागपूर ग्रामीण आणि हिंगणा विधानसभा क्षेत्रात शिवसेनेच्या ओबीसी विभागाला नवे चैतन्य मिळाले आहे. नियुक्ती जाहीर होताच सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांवर कार्यकर्त्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. जनहिताची कामे आणि पक्षविस्तारासाठी हे सर्व पदाधिकारी जोमाने कार्य करतील, असा विश्वास जिल्हाध्यक्ष गुणवंत तपासे यांनी व्यक्त केला आहे.



