Breaking
ई-पेपरकवितापरभणीमराठवाडासाहित्यगंध

खबरबात

संग्राम कुमठेकर जिल्हा लातूर

0 4 8 2 8 4

खबरबात

सांगून थकलोय दुखणी
अश्रू ढाळते हासरी पापणी
निःशब्द झालीय लेखणी
कुणा दाखवू हृदय टोचणी ?

हृदयगाभारी हुंदके दाटले
जखमेवरती चोळताच मीठ
बहरण्यापुर्वी पंख छाटले
कुणी ठरवलं श्रेष्ठ धर्मपीठ ?

खबरबात रे नाही लागली
संविधानाला कसं डावलले?
मनूवादी रे मीठास जागली
लोकशाहीची स्तंभ हालवले

जाती-धर्माची नशा चढली
विचारांची भरकटली दिशा
द्वेषपेरणी सर्वत्र का वाढली ?
प्रकाशाची चेष्टा करी निशा

बेगडी मुखवटे बेगडी माया
पाया पडती घेता खबरबात
नकोशी वाटे विद्रोही काया
गोड बोलूनच करतात घात

संग्राम कुमठेकर
जिल्हा लातूर
==========

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे