‘आदर्श पतसंस्था सर्व वयोगटातील ग्राहकांशी जोडली जात आहे’; अभिजित पाटील
तुषार थळे, प्रतिनिधी
‘आदर्श पतसंस्था सर्व वयोगटातील ग्राहकांशी जोडली जात आहे’; अभिजित पाटील
तुषार थळे, प्रतिनिधी
अलिबाग (प्रतिनिधी) : आदर्श पतसंस्था सर्व परिवाराला लागणार्या सोयी सुविधा देत आहे. लहान मुलांना मनी बॉक्स , कॉलेज मधील मुलांना मोबाईल अॅप, ज्येष्ठ सभासदांना डोअर स्टेप सेवा, महिलांना खास महिला अधिकार्यांकडून सेवा व नवनवीन योजना आणत आहे. आदर्श पतसंस्था सर्व वयोगटातील ग्राहकांना जोडण्याचा प्रयत्न करत आहे, त्यासाठी सर्व सभासदांनी सहकार्य करावे , असे आवाहन आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष अभिजित सुरेश पाटील यांनी आदर्शच्या सभासदांना केले.
आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेची 26 वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी (दि. 10) कुरूळ येथील क्षात्रैक्य चौकळशी माळी समाज सभागृहात आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी आपल्या भाषणात अभिजित पाटील यांनी आदर्श पतसंस्थेचा वार्षिक अहवाल, ताळेबंद आणि नफा तोटा पत्रक सादर केले.
रौप्यमहोत्सवी वर्षात 55 कोटी 13 लाख 51 हजार रूपयांच्या ठेवी वाढल्या आहेत. ठेवी 358 कोटी 5 लाख 25 हजाराच्या झाल्या आहेत. ठेव वाढीचे प्रमाण 18.20 टक्के आहे. रु.260 कोटी 52 लाख रूपयाचें कर्जवाटप करण्यात आले आहे. एकत्रित व्यवसाय 618 कोटी 57 लाख रूपयांचा झाला आहे. संस्थेला रु.6 कोटी 10 लाख रूपयांचा नफा झाला आहे, संस्था कर्ज जलद वाटप करण्यासाठी तंत्रज्ञान आणत आहे अशी माहिती अध्यक्ष अभिजित पाटील यांनी या वेळी सभासदांना दिली.
खोपोली, कर्जत व बोर्ली – मांडला येथे संस्थेच्या नवीन शाखा सुरू करण्याचा व खोपोली येथील शाखेसाठी स्वमालकीची जागा विकत घेण्याचा ठराव या सभेत मंजूर करण्यात आला. तसेच गेल्या वर्षी प्रमाणे यावर्षीही सभासदांना 11 टक्के दराने लाभांश जाहीर केला .
आदर्श पतसंस्थेने लहान मुलांसाठी अनन्या बचत ठेव योजना सुरू करून त्यांचा बचतीची सवय लावली आहे. या योजनेचे 8 हजार खातेदार आहेत. या योजनेत 10 हजार खातेदार करायचे उद्दिष्ट आहे. या वर्षी संस्थेचा एकत्रित व्यवसाय 800 कोटी रूपयांचा करायचे उद्दिष्ट ठेवले आहे, त्यासाठी सभासदांनी सहकार्य करावे, असे आवाहन आदर्श पतसंस्थेचे संस्थापक सुरेश पाटील यांनी या सभेत केले.
संसथेचे उपाध्यक्ष कैलास जगे, संचालक अनंत म्हात्रे, सतीश प्रधान, अॅड. आत्माराम काटकर, विलाप सरतांडेल, अॅड. रेश्मा पाटील, अॅड. वर्षा शेठ, सुरेश गावंड, भगवान वेटकोळी, रामभाऊ गोरिवले, महेश चव्हाण, श्रीकांत ओसवाल, सीए संजय राऊत, डॉ. मकरंद आठवले, कार्यलक्षी संचालिका मीनाक्षी पाटील यांची या सभेला उपस्थिती होती. सभेपूर्वी झालेल्या सभासदांच्या प्रशिक्षण शिबीरात तानाजी पानसकर यांनी मार्गदर्शन केले. संस्थेचे कर्मचारी राकेश घरत यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. उमेश पाटील यांनी सुत्रसंचालन केले.



