पत्रकारिता अभ्यासक्रमातून व्यक्तीमत्वं विकासाची संकल्पना; निलिमा बंडेलू
अमृता खाकुर्डीकर, प्रतिनिधी पुणे
पत्रकारिता अभ्यासक्रमातून व्यक्तीमत्वं विकासाची संकल्पना; निलीमा बंडेलू
अमृता खाकुर्डीकर, प्रतिनिधी पुणे
बिनधास्त न्यूज वृत्तसेवा
पुणे- दि.9(प्रतिनिधी) नगर काॅलेजच्या सी एस आर डी मार्फत 1990 साली सुरू करण्यात आलेला “पत्रकारिता, संज्ञापन आणि जनसंपर्क” (jcpr) हा अभ्यासक्रमात पत्रकार होणा-या विद्यार्थ्यांचा चौफेर व्यक्तीमत्व विकास व्हावा, त्यांनी जबाबदार पत्रकार आणि जागृत नागरिक व्हावे, अशी संकल्पना होती. म्हणूनच प्रसिध्द पत्रकार स्व. गोपाळ मिरीकर, नगर काॅलेजचे व्यासंगी प्राध्यापक मोरजे सर आणि पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रम मान्यता समितीचे सर्व विद्वान सदस्य यांनी फार विचारपूर्वक या अभ्यासक्रमाची रचना केली होती.
पत्रकारितेला जोडून संज्ञापन आणि जनसंपर्क हे विषय संयुक्तपणे समाविष्ट केल्याने या अभ्यासक्रमाचे विद्यार्थी बाहेर पडून समाजाच्या विविध स्तारात यशस्वी कामगिरी करू शकले. या अभ्यासक्रम रचना समितीमध्ये मला काम करता आले आणि कम्युनेकेशन सारखा आवडता विषय शिकवता आला, याचा खूप आनंद आहे, असे उदगार माजी जनसंपर्क अधिकारी व पत्रकार निलीमा बंडेलू यांनी काढले. पत्रकारिता अभ्यासक्रम, पहिल्या बॅचच्या वर्गमित्र स्नेहसंमेलन कार्यक्रमात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या.
अध्यक्षस्थानी मर्च॔ट बँक आणि दै. नगर टाईम्सच्या संचालक मीना मुनोत होत्या. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे महाव्यवस्थापक सुरेश पाटील आणि आकाशवाणी निवेदक सुषमा जाधव हे मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. पुणे -नगर रोडवरील अविनाश कुलकर्णी यांच्या “मधुबन शेतघर’ येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास पुणे व नगर येथे पत्रकार म्हणून काम केलेले पत्रकारिता कोर्सच्या पहिल्या बॅचचे माजी विद्यार्थी आवर्जून उपस्थित होते.
नगर सहकारी मध्यवर्ती बँकेचे महाव्यवस्थापक म्हणून नियुक्त झालेले सुरेश पाटील यांना नुकताच महराष्ट्र राज्याचा “बेस्ट मॅनेजर” म्हणून पुरस्कार प्राप्त झाला असून सुषमा जाधव आकाशवाणीची यशस्वी कारकीर्द संपवून नुकत्याच निवृत्त झाल्या बद्दल वर्गमित्रांच्या वतीने या दोघांचा हृद्य सत्कार करण्यात आला. दिवंगत दस्यांना श्रध्दांजली अपर्ण करून कार्यक्रमाची सुरूवात झाली. प्रास्ताविक अमृता खाकुर्डीकर यांनी केले. पाहुण्यांचा परिचय शिल्पा रसाळ यांनी करून दिला. सूत्रसंचालन सुस्मिता डांगरे यांनी केले.
निलीमा बंडेलू लिखित कष्टक-यांचे विश्व उलगडणा-या ‘अगापे ‘ या पुस्तकाचे ‘ यावेळी प्रकाशन करण्यात आले. माजी समाजकल्याण अधिकारी रफीक मुन्शी यांनी पुस्तक परिचय करून दिला. कैलास ढोले, बाजीराव खांदवे, शकूर शेख, यांनी पत्रकारितेचे थरारक अनुभव सांगितले. बांधकाम व्यावसायिक विनय काळे व अविनाश कुलकर्णी, दिनांक कॅलेंडरचे दिगंबर कोंडा, शिवगोरक्षच्या अजिता डांगरे, पुस्तक विक्रेते सुनिल भांड तसेच दत्ता परभणे यांनी कोर्सचे जुने दिवस आणि दिल्ली स्टडी टूरच्या आठवणींना उजाळा दिला. गुजरातहून अलका मेहता यांनी भावपूर्ण संदेश पाठवला.
निजाम जाहगिरदार यांनी शेरो शायरी सादर करून वातावरण प्रसन्न केले तर तर प्रकाश अमर याने सुंदर एक गझल पेश केली. तब्बल 35 वर्षानंतर पत्रकार वर्गमित्रांची झालेली ही पुनर्भेट फारच भावूक करणारी आणि संस्मरणीय ठरली.



