Breaking
ई-पेपरकवितानागपूरसाहित्यगंध

बरसून जा

सविता धमगाये जि.नागपूर

0 5 7 4 4 8

बरसून जा

आलास आता उशीरा तर
थांबूनच जा जरा प्रहारभर
भरून वाहू दे नद्या नाले
बरसून जा आता अंगणभर

वाट पाहता पाहता तूझी
पेरलेले सारे सुकून गेले
पळवले ना तोंडचे पाणी
डोळ्यातले पाणी खेचून नेले

रडावं म्हटलं तर रडतांना
कंठातून शब्द फुटत नव्हते
वेड्यासारखी वाट पाहतांना
विचारांनी थैमान घातले होते

आता पड जरा मुसळधार
वंसुधरेला होऊ दे तृप्त
मिटू देत तहान झऱ्याची
वाहू दे खळखळून फक्त

पुन्हा नजरेत स्वप्न फुलले
हिरवे रान पाचूंनी भरले
पेर्तेव्हा च्या सूमधूर स्वरांनी
आनंदाचे भरते उरले

सविता धमगाये
जि.नागपूर

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 7 4 4 8

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे