
0
5
7
4
4
8
गुरू
गुरू दाखवी सत्य दिशा
ज्ञानाचा दीपस्तंभ असे
मार्गदर्शक होऊन सदा तो
प्रकाश पुंज तारा भासे
संस्काराचा तो वेलू
असे तो सदा बहरत
शिस्त,कर्तव्य,परिश्रमाने
तो असे सदा लहरत
निर्मळतेचा असे झरा तो
वाहत असे नित्य सदा
शिकवण त्याची असे ऊत्तम
नव ऊर्जेची असे अदा
चैतन्याची ज्योत पेटवी
प्रकाशित होत असे जीवन
मातीच्या गोळ्यास आकार देई
फुलवी तो अनुशासन
गुरू हे दैवत अमुचे महान
करू आम्ही सदा वंदन
शक्तीची ती असे ज्योत
ह्रदयी आनंद सदा तेवत
पुरुषोत्तम ठोंबरे
झिंगाबाई टाकळी, नागपूर
0
5
7
4
4
8



