
0
5
9
0
3
4
हपापलेले
इतरांसाठी कुणी नसे
जो तो पाहे आपापले
गौण झालेय सत्कार्य
सत्कारार्थ हपापलेले.. //
मान,सन्मान,प्रतिष्ठेस
आहेत सारे भुकेलेले
त्याग, कष्ट, साधनेस
मात्र अनेक मुकलेले…//
वडिलोपार्जित सत्तेस
भाऊ भाऊ खेटलेले
सेवेसाठी कुणी नाही
स्वार्थासाठीच पेटलेले.. //
ऋणानुबंधांचे धागेदोरे
आपापसात ताणलेले
मी म्हणेन तेच मानावे
अहंकार असे ठाणलेले.. //
जिव्हाळ्याचे सुसंवाद
जिथे तिथे आटलेले
नात्यागोत्यांचे वस्त्रही
जागो जागी फाटलेले…
विष्णू संकपाळ
बजाजनगर छ. संभाजीनगर
0
5
9
0
3
4



