Breaking
आरोग्य व शिक्षणकोकणमहाराष्ट्रमुंबई

जे. एस. एम. महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय युवा दिन उत्साहात

विद्यार्थ्यांनी महापुरुषांचे चरित्र वाचण्याचे व चांगले कार्य करण्याचे व्यसन अंगिकारावे:

0 4 8 2 9 7

जे. एस. एम. महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय युवा दिन उत्साहात

विद्यार्थ्यांनी महापुरुषांचे चरित्र वाचण्याचे व चांगले कार्य करण्याचे व्यसन अंगिकारावे: सहाय्यक आयुक्त सुनील जाधव यांचे प्रतिपादन

तुषार थळे, प्रतिनिधी

अलिबाग: 12/08/2024 जे. एस. एम. महाविद्यालयात दि. 12 ऑगस्ट 2024 रोजी आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त युवकांपुढील आव्हाने व समस्या या विषयावर मार्गदर्शनपर व्यख्यान आयोजित करण्यात आले या कार्यक्रमासाठी समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री सुनील जाधव, प्राचार्या डॉ. सोनाली पाटील, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रविण गायकवाड, प्रा. अश्विनी आठवले, डॉ. पंकज घरत, कॉमर्स विभागप्रमुख डॉ. प्रेम आचार्य, तसेच प्रा. श्वेता पाटील, प्रा. शंतनुराज वॉल्डे व एन. एस. एस. चे विद्यार्थी उपस्थित होते.

जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अॅड. गौतम पाटील यांनी विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. सहाय्यक आयुक्त श्री सुनील जाधव आपल्या मनोगतात म्हणाले कि, विदयार्थ्यांनी नशा व मादक पदार्थांपासुन दूर रहावे, व्यसनाधिता ही एक युवकांपुढील खूप मोठी समस्या व आव्हान आहे. ते पुढे म्हणाले विद्यार्थ्यांनी महापुरुषांचे चरित्र वाचण्याचे व्यसन स्वतःला लावून घ्यावे. चांगले समाजकार्य करण्यासाठी प्रयत्न करावेत असे श्री सुनील जाधव म्हणाले.

प्राचार्या डॉ. सोनाली पाटील यांनी आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना सांगितले कि, विद्यार्थ्यांना व्यसणाधीनते बरोबर मोबाईलचे व्यसन व समाजमाध्यमावर सर्फीग करण्याचे व्यसन अधिक लागले आहे त्यापासून स्वतःला दूर ठेऊन वैधानिक कार्य करण्याचे व्यसन अंगिकरावे. मनोगताच्या शेवटी डॉ. सोनाली पाटील यांनी सर्व विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय युवा दिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर डॉ. प्रेम आचार्य यांनी विद्यार्थ्यांना नशामुक्तीबाबत शपथ दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अश्विनी आठवले यांनी केले तर डॉ. प्रविण गायकवाड यांनी आभारप्रदर्शन केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे