Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरकवितानागपूरविदर्भसाहित्यगंध

जगतो कसा?

सुधाकर भगवानजी भुरके आर्य नगर, जि. नागपूर

0 5 1 7 9 5

जगतो कसा?

जे जे नितीमत्ता घालवती
तेच बघा सत्ता गाजवती…
उमटवती क्रूरतेचा ठसा,
तरी क्रूर हा जगतो कसा?…१

ज्यांनी कोणी प्रित नाही केली,
घृणेमध्ये पूरी जिंदगी गेली…
प्रेम तृष्णाने न सुकतो घसा,
तरी सांगा हा जगतो कसा?…२

ज्यांना मुळी न स्नेह जिव्हाळा,
दावी बनावटी कळवळा…
दानात दिलेना कुणा पसा,
ऐसा हा स्वार्थी जगतो कसा?…३

विसरून सारी नातीगोती,
भरे धनाची माफक पोती…
दिला न त्यातला एक दसा,
संधीसाधू हा जगतो कसा?..४

मायबापा जे देती त्यागून,
सेवा तत्व ते जाती सांगून…
नालायक पुत्र असा कसा?,
तरी अपात्र जगतो कसा? ..५

केवळ धनाचा अभिलाषी,
कुणाच्या गळा लावीते फाशी…
बेशर्मीचा जपतोय वसा,
तरी बेशर्म जगतो कसा?…६

जिथे पैसा तिथे लोटांगण,
निर्धनाचे त्यागती अंगण…
गोडासाठी हा झोंबतो ऊसा,
तरी निर्लज्ज जगतो कसा?…७

नाही तत्व नाही माणुसकी,
वृत्ती असे केवळ कुजकी…
‘सुधाकरा’ यांची भ्रष्ट दिशा,
तरीही भ्रष्ट ‘जगतो कसा?’…८

सुधाकर भगवानजी भुरके
आर्य नगर, जि. नागपूर

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 1 7 9 5

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे