
0
4
8
2
5
1
आयुष्य हे
आयुष्य हे मिळालेलं
एक सुंदर वरदान आहे
जिवितकर्तव्य पार पाडतांना
देवाने सोडलेलं फर्मान आहे ॥
आयुष्य म्हणजे प्रश्नांचा
एक जिवंत प्रवास आहे
पावलागणिक थांबणारा
अन् पुढे ढकलणारा श्वास आहे ॥
स्वप्नाचं ओझं वाहतांना
कधी ओझंच स्वप्न बनून जातं
सुख दुःखाच्या उन सावलीत
आशेचं बीज रुजतं ॥
आयुष्याच्या अनुभवातून
वेळ शिकविते शांत राहणं
केवळ जिंकणं म्हणजे जगणं नव्हे
तर हरतांना दुसऱ्यास जिंकवणं ॥
आयुष्य हे वेदनेतही
खूप काही शिकवून जातं
सकारात्मकतेने पाहिले तर
आनंद दिल्यास प्रेम मिळतं ॥
सरला टाले
राळेगाव, जि.यवतमाळ
==========
0
4
8
2
5
1



