Breaking
ई-पेपरपुणेमुंबईवर्धाविदर्भ

राज्यातील कर्तृत्ववान महिलांसाठी पुरस्कार २०२६ चे आयोजन

वसुधा नाईक, पुणे

0 4 8 2 8 4

राज्यातील कर्तृत्ववान महिलांसाठी पुरस्कार २०२६ चे आयोजन

जागतिक महिला दिनी निकाल होणार जाहीर

वसुधा नाईक, पुणे

बिनधास्त न्यूज नेटवर्क

पुणे: (दि १२) शिक्षकांचे राज्यस्तरीय व्यासपीठ असलेले शिक्षक ध्येय, मातृसेवा फाउंडेशन, ठाणे आणि यशिता गार्डन नर्सरी, हिंगणघाट जिल्हा वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील महिलांसाठी ‘कर्तृत्ववान महिला पुरस्कारासाठी राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर आधारित हा पुरस्कार देण्यात येणार आहे. महिलांनी राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती राज्यातील इतर सर्व नागरिकांना व्हावी, महिलांच्या कार्याला उत्तेजन देणे, त्यांचे कौतुक करून, प्रोत्साहनासह त्यांच्यातील कर्तृत्व वाढीस लावणे हा या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे.

उपक्रम सादर करण्याची अंतिम तारीख २० फेब्रुवारी २०२६ आहे. विजेत्या महिलांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र देण्यात येईल तसेच सर्व सहभागी महिलांना डिजिटल सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल.

राज्यातील उपक्रमशील महिलांनी या स्पर्धेत भाग घ्यावा, असे आवाहन ‘शिक्षक ध्येय’चे मधुकर घायदार, प्रभाकर कोळसे; मातृसेवा फाउंडेशनच्या संस्थापिका संध्या सावंत; यशिता गार्डन नर्सरीचे अथर्व गडवार; डी. जी. पाटील, विजय अहिरे, मेघा पाटील, नंदुरबार; कविता चौधरी, भाग्यश्री पवार, श्रद्धा पवार जळगाव; मंजू वानखडे, अर्चना भरकाडे, अंजली वारकरी, अमरावती; अशरफ आंजर्लेकर, विद्या देवळेकर, रत्नागिरी; कैलास बडगुजर, ठाणे; राजेंद्र लोखंडे, नाशिक; कांबळे एस. जी. पाटोदेकर, महादेव खळूरे, लातूर; खुशाल डोंगरवार, भंडारा; वसुधा नाईक, अश्विनी दीक्षित, पुणे; सुरेखा उजगरे, प्रेमजीत गतीगंते, संगीता पवार, मुंबई; सविता डाखोरे, सोलापूर; धन्यकुमार तारळकर, सातारा; संजय पवार, रायगड; दिवाकर मादेशी, गडचिरोली; सी एच बिसेन, गोंदिया यांनी केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे