0
4
8
2
9
4
पेटती चिता
रुग्णालयात नाही खाटा
नाही मसनवाटेत लाकूडफाटा!!
भान नाही राहिले
चितांनाही भडकण्याचे
पाहून एकावर एक
रचलेले सांगाडे!!
कुणाचा भाऊ कुणाची आई
कुणाला कुणाची पहचान नाही
लपेटलेले मुडदे पहात राही!!
ठेवता लाश सरणावर
डाग द्यायला नाही त्राता
दुःखाने झुरते पेटती चिता!!!
लोप पावला दहावा अन् तेरावा
अस्थी विसर्जन कसे करावे
श्राद्धालाही नाही राहिला पुत्र नेणता!!!
जळत राहिल्या पेटत्या चिता
बी.आर. पतंगे (beeke )
जि.अहिल्यानगर
=======
0
4
8
2
9
4



