“आभारीय शब्दसुमने, दोन शब्द कृतज्ञतेचे”; बी एस गायकवाड
ऋणनिर्देश मराठीचे शिलेदार समूहासाठी

“आभारीय शब्दसुमने, दोन शब्द कृतज्ञतेचे”; बी एस गायकवाड
ऋणनिर्देश मराठीचे शिलेदार समूहासाठी
या सप्ताहात सुरु असलेल्या स्पर्धेत सोमवार ते शनिवार, माझ्या रचनेला सर्वोत्कृष्ट रचनेत स्थान देऊन (फक्त चित्र चारोळी वगळता) सन्मानित करण्यात आले. या पूर्वीच्या स्पर्धेच्या सप्ताहातील देखील तीच स्थिती राहिली आहे. म्हणजेच मागील स्पर्धा सप्ताह दिनांक १२ मे ते १७ मे आणि आता दिनांक २६ मे ते ३१मे या दोन्हीही स्पर्धेच्या सप्ताहात माझ्या चित्र चारोळी वगळता, सर्व रचनांना सर्वोत्कृष्ट रचनेत स्थान देऊन सन्मानित करण्यात आले आहे. त्याबद्दल सर्वप्रथम समूहाचे सर्वेसर्वा मुख्य प्रशासक आदरणीय राहुल सर, मुख्य परीक्षक आदरणीय सविताताई ठाकरे पाटील व समुहातील सर्व परीक्षक ताई, दादा सर्वांचे मनःपूर्वक खूप खूप धन्यवाद.
ईच्छा असूनही तेंव्हा मागील सप्ताहात वेळेअभावी आभार व्यक्त होता आले नाही. समूहात आल्यापासून सर्वच काव्य प्रकारात लिहिण्याचा प्रयत्न राहिला आहे.
आणि रचनेचा सन्मान होतो तेंव्हा एक वेगळी अनुभुती, चेहऱ्यावर आनंद निर्माण होतो. तसेच समूहातील ताई दादांचे परिक्षण तर एक खास पर्वणीच असते. वाचतांना प्रत्यक्ष जिवंतपणा लेखणीत ओतप्रोत भरलेला असतो. समूहाकडून खुप काही नावीन्यपूर्ण अनुभव मिळत जातात. या सप्ताहात सोमवारीय त्रिवेणी रचना’ ‘पापणी’ मंगळवारीय बालकाव्य’ फजिती’, बुधवारीय ‘हुंकार’, शुक्रवारी हायकू काव्य, आणि शनिवारी ‘अंधारयात्री,’ अशाप्रकारे रचनांना सर्वोत्कृष्ट रचनेत स्थान देऊन सन्मानित करण्यात आले आहे. मन भारावून जाते.
मी मला खूप भाग्यवान समजतो. कारण की,लातूर, बुलढाणा व आता छ.संभाजी नगर या तिन्ही ठिकाणी सलग झालेल्या राज्यस्तरीय काव्य संमेलन व पुस्तक प्रकाशन सोहळ्यास उपस्थित राहून, नेत्रदीपक सोहळ्यात सामील होऊन प्रत्यक्ष साक्षीदार होता आले. भव्यदिव्य दिमाखदार सोहळा अनुभवता आला. अविस्मरणीय असे आनंदाचे क्षण डोळ्यांनी टिपता आले. मनोमन हर्ष झाला. छ. संभाजी नगर येथील अद्वितीय असा डोळ्याचे पारणे फेडणारा सोहळा झाला. मराठीचे शिलेदार समूहाने सर्वांनाच भरभरून दिले आहे. एक हक्काचं व्यासपीठ, योग्य मानसन्मान मिळतो ते याच ठिकाणी. सर्वांच्या मताचा आदर केल्या जातो. रचनांचा सन्मान करून काव्य प्रकाशनाची संधी मिळते . याचाच परिपाक, तब्बल बावीस पुस्तकांचे प्रकाशन या वर्षी संस्थेतर्फे थाटामाटात कऱण्यात आहे आहे.
यापुढे ही अविरत असेच सोहळे पार पडतील. त्यासाठी शिलेदार समूहाचे सर्वेसर्वा मुख्य प्रशासक आदरणीय राहुल दादा, सचिव आदरणीय ऍड.पल्लवीताई पाटील, मुख्य परीक्षक आदरणीय सविताताई ठाकरे पाटील, ज्येष्ठ परिक्षक वैशाली ताई अंड्रस्कर , स्वातीताई मराडे , शर्मिलाताई घुमरे, वृंदाताई करमकर, प्रतीमाताई नंदेश्र्वर, विष्णू दादा संकपाळ, संग्राम दादा कुमठेकर, अशोक दादा लांडगे, अरविंद उरकुडे दादा, हंसराज खोब्रागडे दादा या सर्व मान्यवरांचे मोलाचे योगदान आहे. त्यांच्या मुळेच सर्वकाही शक्य झाले आहे.कितीही व्यस्त असले तरी प्रत्येकाला वेळ देऊन आदरणिय राहुल दादा आपली कर्तव्ये, जिम्मेदारी चोख पार पाडत असतात. याची प्रत्येकाला अनुभुती आलेली आहेच. आदरणीय राहुल दादां व समुहातील परीक्षक, सहपरिक्षक, सहप्रशासक, संकलक सर्व ताई दादा आपणा सर्वांना धन्यवाद देऊन सदैव ऋणाईत राहणे पसंत करतो.
बी एस गायकवाड
पालम परभणी
सदस्य, मराठीचे शिलेदार समूह





