दहावीचा मराठीचा पहिलाच पेपर फुटला
राज्य शिक्षण मंडळाच्या कॉपीमुक्त अभियानाचे तीन तेरा
दहावीचा मराठीचा पहिलाच पेपर फुटला
राज्य शिक्षण मंडळाच्या कॉपीमुक्त अभियानाचे तीन तेरा
जालना जिल्हा प्रतिनिधी
बिनधास्त न्यूज नेटवर्क
जालना: (जि प्र): महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या वतीने काही दिवसांपूर्वी कॉपीमुक्त परिक्षा अभियानाबाबत राज्यातील सर्व शाळांमध्ये शिक्षक आणि विद्यार्थ्यांना याबाबत मार्गदर्शन करण्यात आले होते. राज्यातील सर्वच शाळा या अभियानात सहभागी झाल्या होत्या. मात्र याबाबत राज्य माध्यमिक शिक्षण मंडळ अपयशी झाल्याचं दिसून आलं आहे.
मराठवाड्यात शिक्षण क्षेत्रात काहीही होते या आणि अशा कित्येक घटनेचा प्रारंभ करणा-या या विभागात दहावीचा मराठीचा पेपर फुटला, उत्तर पत्रिकांच्या प्रिंट काढून विद्यार्थ्यांना पुरवल्या. पहिल्याच दिवशी दहावीच्या मराठी पेपर फुटीला ग्रहण लागलेलं आहे. जालन्यात दहावीचा मराठीचा पेपर फुटला आहे. जालना जिल्ह्यातील बदानापूर येथे दहावीचा मराठीचा पेपर फुटला आहे. शहरातील झेरॉक्स सेंटरमधून उत्तरपत्रिकांच्या प्रिंट काढून विद्यार्थ्यांना पुरवल्या जात आहेत. त्यामुळे आता खळबळ उडाली आहे.
दहावीच्या परिक्षेला आजपासून सुरुवात झाली असून परिक्षेचा पहिलाच पेपर फुटल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पेपर सुरु झाल्यानंतर काही मिनिटातच ही घटना समोर आली. सदर विषयाच्या उत्तरपत्रिकांच्या प्रिंट विद्यार्थ्यांना आधीच दिल्याची बाब उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ माजली आहे.जालन्यात झालेल्या या धक्कायक प्रकारावर शिक्षण मंडळ काय भूमिका घेणार हे पाहणं आता महत्त्वाचं आहे. कारण पेपरफुटीला हातभार लावणारे नेमके कोण याचाही शोध घेणे गरजेचे आहे.