नवीन सुरुवात…नवी पहाट….!; शर्मिला देशमुख
मंगळवारीय बालकाव्य स्पर्धेचे परीक्षण
नवीन सुरुवात…नवी पहाट….!; शर्मिला देशमुख
मंगळवारीय बालकाव्य स्पर्धेचे परीक्षण
घडवण्या भारतभूचा
जाज्वल्य इतिहास
पुन्हा नव्याने उगवली
धरेवर नवी पहाट
दिवस उगवतो रात्र होते, पुन्हा दिवस उगवतो हा क्रम निरंतर चालू असतो.न थकता, न थांबता.असेल कोणाचे जीवन खडतर, दुःखाच्या ओझ्याखाली दबलेले.तयास काळाने देऊन औषध, नव पहाटेने बहरलेले. नसेल जगण्याचे कारण जरी, नवी पहाट उगवते जीवनात तरी. दिला उद्या प्रारब्धाने,जगत जावे आनंदाने.
या जगण्यावर या मरणावर
शतदा प्रेम करावे….
झाले गेले विसरून जावे
पुढे पुढे चालावे…..
जीवन गाणे गातच रहावे…..
कशास उद्याची चिंता आज तू जगून घे, जन्म तुझा जगण्यासाठी आनंदाची उधळण दे.उद्याची चिंता न करता आनंदाने सतत परिश्रमात घालवलेला वेळ यशाचे शिखर सर करण्यासाठी मदत करतो. काळोख्या रात्रीनंतर ही उद्या घेवून येतो उषःकाल. येतील काळे ढग जीवनात किती, नको खचाया , नको हाराया.. तुडवत साऱ्या संकटांना चालावे एकताल.नको विरस क्षणभर मनीचा, दुःखाने घालवायचा. हसत-खेळत निरस बालपण, प्रत्येक क्षण हा जगावयाचा.
भले बुरे जे घडून गेले
विसरून जाऊ सारे क्षणभर
चला विसावू या वळणावर….
सूर्याला सहजच विचारले.. हे सूर्य देवा,जगाला प्रकाशमान करणारा तू, उर्जा दायी, प्रेरणादायी तू…तरी तुलाही मावळावे लागतेच की.तुला मावळताना नाहीत का होत वेदना? सूर्य म्हणाला मी डुंबतो तो दुःख ,वेदना ,चिंता ,समस्या यांना घेऊन आणि उगवतो प्रसन्न,उल्हसित प्रफुल्लित, नवचैतन्याने भरलेली नवी पहाट घेऊन. अशी चैतन्यदायी पहाट हवी तर मला मावळावे लागणारच की. तुमच्या मनातील चिंता, क्लेश, द्वेष ,भय या भावनांना मावळण्यासाठी मी मावळतो आणि उद्याच्या सकारात्मक भावना घेऊन आनंदाची नवी पहाट तुमच्या जीवनात आणून मी उगवतो .या पहाटे बरोबरच जणू थांबलेले हे विश्व पुन्हा चैतन्याने बहरते. तेच ते मनात न ठेवता वाईट गोष्टी मनातून काढून सकारात्मक विचारांची पेरणी मनामनात होणे आवश्यक असते. वसुंधरा जशी कोवळ्या किरणांनी चमकते तशी चैतन्याची पेरणी करण्यासाठीच तर मी पुन्हा उगवतो. सुखदुःखाचे क्षण घालवून पुन्हा नव्या जोमाने कार्यतत्पर होण्यासाठी, नव ऊर्जा घेऊन मी येतो. दिवसभर श्रम करून थकल्या भागलेल्यांसाठी विश्राम मिळावा यासाठी तर मावळतो. क्षणभर विसावा निशेच्या कुशीत.. क्षणभर ओलावा मायेच्या कुशीत. नवी स्वप्ने, नवी आशा ,नवी मनिषा, नवा उत्साह, नवी पहाट मी घेऊन येतो. या नववर्षाच्या पहाटेचे स्वागत नव्या उत्साहाने करूया. नव्या बहरात बहरू या .रोजच येते नवीन उषा ,घेऊन नवनव्या मनिषा. नववर्षारंभी ठरवूया आनंदी जगण्याच्या नवदिशा !
आज राहुलदादांनी मंगळवारीय बालकाव्य स्पर्धेसाठी “नवी पहाट” असा विषय दिला आणि जणू शिलेदार समूहामध्ये नवीन पहाट उजाडली. वेगवेगळ्या विचारांच्या बालकविता समूहामध्ये फेर धरू लागल्या. सर्व बालमनाच्या शिलेदारांचे अभिनंदन! मला राहुल दादांनी परीक्षण लिहिण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे मनस्वी आभार. सर्व मराठीचे शिलेदार समूहातील सदस्य,सभासद ,प्रशासक सहप्रशासक यांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा…. धन्यवाद!!
शर्मिला देशमुख -घुमरे बीड
सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह