सुमती धनाजी भगत यांचे दुःखद निधन
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
अलिबाग: आवास गावातील एक प्रेमळ व्यक्तीमत्व सुमती धनाजी भगत यांचे मंगळवार दि. ३१ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ७.१५ वाजता आवास [ भगत आळी ] येथे राहत्या घरी वयाच्या ९३ व्या वर्षी वृध्दापकाळाने दुःखद निधन झाले. रात्री ११.०० वाजता आवास [ भगत आळी ] येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्यविधीला मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता. त्यांचा दशक्रिया विधी गुरूवार दि. ९ जानेवारी २०२५ रोजी आवास [ भगत आळी ] येथे सकाळी ९.०० वाजता होणार आहे.
सुमती धनाजी भगत अतिशय मायाळू, प्रेमळ, सुस्वभावी व कष्टाळू होत्या. त्यांच्या निधनाने आवास गावावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन सुना, एक मुलगी, एक जावई, पाच नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या परिवाराला या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो आणि त्यांच्या आत्म्यास चिरःशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.