कास्ट्राईब जि.प.कर्मचारी संघटनेतर्फे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिनदर्शिका भेट
विविध खात्यातील माहिती देऊन बैठकीचे आयोजन करणार
कास्ट्राईब जि.प.कर्मचारी संघटनेतर्फे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिनदर्शिका भेट
विविध खात्यातील माहिती देऊन बैठकीचे आयोजन करणार
कर्मचा-यांच्या समस्या मांडण्यासाठी पदधिकारी घेणार आढावा बैठक
बिनधास्त न्यूज वृत्तसेवा
छत्रपती संभाजी नगर प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर: (दि २७ मार्च): मा.अंकित सर, मुख्य कार्यकारी अधिकारी (IAS), जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर यांची कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेच्या वतीने आज दि.27 मार्च 2025 रोजी सदिच्छा भेट घेवून सत्कार करण्यात आला.
नुकतेच जळगाव येथेन बदलून आलेले मु. का. अ. यांना कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे वरीष्ठ उपाध्यक्ष मा.सुमित भुईगळ यांनी कास्ट्राईबची दिनदर्शिका व दैनंदिनी मा.मुंख्य कार्यकारी अधिकारी साहेबांना देवून संघटनेच्या महाराष्ट्रात विविध खात्यांत चालू असलेल्या कामकाजाची माहिती दिली व 16 जानेवारी 2025 रोजी जळगाव येथे कास्ट्राईब सोबत झालेल्या बैठकी बाबत चर्चा केली.
मा. मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांनी यावेळेस आपल्या कर्मचाऱ्यांच्या काही अडचणी आहेत, अशी विचारणा केली असता मा.सुमित भुईगळ सरांनी आज सदिच्छा भेट आहे, नंतर आम्ही रीतसर बैठकीचे पत्र देणार आहोत त्यात सगळे प्रश्न प्रशासनाकडे मांडू असे सांगितले यावर मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांनी सगळे प्रश्न सोडविण्यात येईल असे आश्वासन दिले.
याप्रसंगी मा.अमित ऊमरजकर जिल्हाध्यक्ष कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटना, दिव्यांग शाखेचे जिल्हाध्यक्ष ग्याणुजी दळवी, संजय वाघ जिल्हा कार्याध्यक्ष, अर्चना बारे मॅडम जिल्हा सचिव, मा. देविदास बिरारे, महासंघाचे सुशिल बनकर, तेजस्विनी तुपसागर, दीक्षांत खंडागळे जिल्हा उपाध्यक्ष, केतन गव्हाळेकर जिल्हा संघटक, संजय ई्गळे जिल्हा कोषाध्यक्ष, मनोहर राजपुत, आव्हाड व विजय वासने यांच्यासह जिल्हा परिषदचे अनेक पदाधिकारी उपस्थीत होते.





