Breaking
ई-पेपरकविताछत्रपती संभाजी नगरमराठवाडासाहित्यगंध

सत्वपरीक्षा

विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर

0 4 8 2 5 1

सत्वपरीक्षा

मी कोळसा नव्हे सुवर्ण
बघ हवे तितके पारखून
घे हवी ती सत्वपरीक्षा
येईन अग्नीतून सुलाखून.. //

तू देव,दैव, नियती असो
किती घेशील अंत पाहून
मी पाषाणाच्या छातीवर
उभाच राहीन पाय रोवून.. //

निर्धाराने करीन सामना
येवोत लाख वादळ वारे
घनगर्द तमाचा पट भेदून
मी उघडेन उजेडाची दारे.. //

पर्वतप्राय संकट तरीही
वृत्ती नसे डगमगण्याची
पराजयाची खंत ना खेद
चर्चा होईल लढण्याची.. //

रडेल तो लढेल काय
हीच स्वाभाविक निती
जगायचे तर हिम्मतीने
मरणाची नसेच भिती.. //

विष्णू संकपाळ
बजाजनगर छ. संभाजीनगर

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 5 1

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे