0
4
8
2
9
7
कशाला उद्याची वाट
कशाला उद्याची वाट
पाहतोस रे तू माणसा
आजचे काम आज कर
नको निमंत्रण रे आळसा
भविष्यात काय दडलंय
कुणाला कधी कळलयं?
भूतकाळ मागेच संपला
वर्तमान बघ प्रकाशलाय
उद्याचे काय कुणी पाहिले?
आजचे काम आज केले
त्याचेच बघ सार्थक झाले
त्याने जगावर राज्य केले
वाचाळता काय कामाची?
कामे तडीस न्यावयाची
नको उगा कढी बोलाची
वाफ तोंडाची दवडायची
क्षण क्षण लावावा सार्थकी
भविष्य जाणून काय मिळे?
आजचे काम आजच कर
क्षणा मागे क्षणही पळे
वृंदा(चित्रा)करमरकर
जिल्हा सांगली
========
0
4
8
2
9
7



