0
4
8
2
9
0
पैशाचा बाजार
सुखलोलूप हीं माणसं
स्वार्थापायी होती हैवाण,
लयास गेली माणुसकी
सद्गुण ठेवी नित्य गहान.
सगेसोयरे आप्त स्वकीय
म्हणतील मला चांगला,
सरबराईच्या मोजमापात
म्हणतील चिकट वांगला.
खोट्यापुढे सत्य हारले
खऱ्याचा होई लिलाव,
नितीमुल्ले लयास जाताना
डगमगली जीवन नाव.
पैशाचा बाजार खुळा
आहे वरवरचा देखावा,
श्रीमंत माझासारखा मीच
करतो काव काव कांगवा.
अति सुखाच्या मोहापायी
जडले मानवास व्यसनं हजार,
पैश्यानंही, मिळेना झोप शांत.
होई,दुर्घरआजाराने बेजार.
मायादेवी गायकवाड ठोकळ
मानवत परभणी
=========
0
4
8
2
9
0



