0
4
0
9
0
3
घातपात
नको कुणाचा द्वेष,मत्सर
कधी कुणाचा नको घातपात
निरंकारी बुद्धीने मानवा
वाग आपुल्या जीवनात
सोडून दे कपटनिती
वाग प्रत्येकाशी सौजन्याने
घे सत्याचा आधार
जगावे जीवन माधुर्याने
षडरिपूंचा विळखा भोवती
कर तयाला परास्त तू
नको मनी वाईट विचार
नितीमान जीवन तथास्तू
जैसे अपुले कर्म तैसे
फळ देतो परमेश्वर
घातपात हा नाही भला
भोगावी लागे फळे तत्पर
समदृष्टी सर्वांसाठी ठेव
चिंतू नये कुणाचे वाईट
चिंतामुक्त जीवन जगण्या
हो तू सत्याचा पाईक
*श्रीमती सुलोचना लडवे*
*अमरावती*
*सदस्या,मराठीचे शिलेदार समूह*
0
4
0
9
0
3





