Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजनपरीक्षण लेखबीडब्रेकिंगमराठवाडासाहित्यगंध

“कृतज्ञतेचे दवबिंदू… अक्षरातून सजतांना …!”; राजश्री ढाकणे

0 3 1 7 9 3

“कृतज्ञतेचे दवबिंदू… अक्षरातून सजतांना …!”; राजश्री ढाकणे

अक्षरातले दवबिंदू सारे
सर्वोत्कृष्ट स्थानी सजले
पूज्य सानेगुरुजी जयंतीला
मन हर्षात चिंब भिजले…!”

सर्व ‘मराठीचे शिलेदार’ परिवाराला सस्नेह वंदन आणि नाताळ सणाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ..!!!…

“तुमचा फोटो पाठवा” हे आदरणीय राहुल दादांचे ‘तीनच शब्द’, पण त्यात खूप मोठा आनंद, आश्चर्यरुपी कुतूहल दडलेलं असतं…!…मग थोडया वेळाने सर्व समूहात फेरफटका मारल्याशिवाय कळत नाही की ; आपले पोस्टर कोणत्या साहित्याच्या चौकात आहे…!…ते दृष्टीस पडण्याआधी शिलेदार परिवारातील प्रेरणादायी… कौतुकपर… अभिनंदनीय शुभेच्छापुष्प बघून मन आनंदात चिंब भिजले …!… मग सर्वांना कृतज्ञतापूर्वक हात जोडत जोडत थेट पोस्टर गाठले नि माझीच पोस्टर रचना मी श्वास रोकून वाचली …!..ती माझी नेहमीची सवय आहे; याचे कारण कोणतीही रचना करताना मन अगदी बेधुंद झालेले असते…!

शब्दांच्या आणि अनुभवलेल्या प्रसंगाच्या वेगळ्याच दुनियेत रममाण झालेले असते…पोस्टर बघून आणि पुष्पवर्षाव पाहून… मग दिवसभर एक वेगळंच वारं अंगात भिनलेलं असतं…!..वेगळाच उत्साह, आनंद मूठभर मास आल्यागत अवस्था होते… मग एवढा आनंद ज्या परिवारात मिळतो तिथं कृतज्ञता भाव दाटून आल्याशिवाय राहत नाही…एकदा कामाच्या ढिगाऱ्यात शिरले की, हे सर्व राहून जातं… अगदी तसंच झालं शाळेत कार्यक्रम आणि गल्लीत वार्षिक सप्ताह सुरु आहे त्यात आमची पंगत आजच त्यामुळे कालपासूनच व्यस्त…त्यामुळे कृतज्ञता भाव व्यक्त करण्यासाठी उशीर झाला तरी लिहायचं असं ठरवून सुरुवात करताच शब्दांची साथ मिळून…सर्व दवबिंदू अक्षरातून सजवता आले; ही फक्त शिलेदार परिवाराची जादू आहे ..!!!.

काल दिनांक २४.१२.२०२४ रोजी समूहात डोकावलं आणि विषय वाचला “दवबिंदू”काव्यरचना केली आणि आदरणीय परीक्षकांना भावली… आणि तिचा सन्मान करून भले मोठे पोस्टर प्रत्येक कविता समूहात लावले…!.. खरंच खूप छान वाटले आज…!!..जेव्हा मी “दवबिंदू” विषय वाचला त्याक्षणीच बालपणातले अनेक हृदयस्पर्शी प्रसंग डोळ्यासमोर तरळून गेले जे मी आईसोबत अनुभवले होते.

डोळ्यातील अश्रूला काल मात्र दाबून ठेवून जरा सौंदर्यदृष्टीने हे दवबिंदू सजवायचे ठरवले आणि शब्द माझ्या मदतीला धावून आले…!…बघता बघता दवबिंदूनी पंचवीस ओळीत छान पंगत मांडली… पूर्ण झाल्यानंतर मी रचना वाचून बघितली मला स्वतःला ती सर्वोत्कृष्ट वाटली… आणि मनात वाटले ही रचना सन्माननीय परीक्षकांना नक्की आवडेल आणि मनातील भाव खरे ठरले…!…आणि रचना सर्वोत्कृष्ट स्थानी विराजित झाली…पण पूज्य साने गुरुजी जयंती कार्यक्रमामुळे पोस्टर आणि त्यावर सर्व आदरणीय दादा ताईंनी केलेल्या कौतुकाचा…! अभिनंदनाचा..!! वर्षाव जरा उशिरा बघून प्रतिक्रिया दिली… आपण मला समजून घ्याल ही माफक अपेक्षा.

“आजची सर्वोत्कृष्ट काव्यरचना पोस्टर ” या नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत माझ्या ‘दवबिंदू ‘ काव्यरचनेची सर्वोत्कृष्ट स्थानी निवड करून लेखणीला सन्मानित केल्याबद्दल मी शिलेदार परिवाराचे सर्वेसर्वा मुख्य संस्थापक अध्यक्ष.. आदर्श प्रशासक… विविध स्पर्धेचे मुख्य आयोजक… मराठी भाषेला आयुष्यात दर्जा मिळवून देण्यात सिंहाचा वाटा असणारे… शिलेदार विद्यापीठाचे कुलगुरू… देवांश… ध्येयवेडे अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय श्री राहुलदादा पाटील, तुमच्या कार्यात खंबीर साथ देणाऱ्या त्यांच्या अर्धांगिनी आणि संस्थेच्या सचिव पल्लवीताई पाटील, शिलेदार परिवाराच्या मुख्य प्रशासक… मुख्य परीक्षक… संपादक संवेदनशील व्यक्तिमत्व प्रिय सौ. सविता पाटील ठाकरे, मुख्य प्रशासक…परीक्षक.. संकलक… प्रेमळ व्यक्तिमत्व प्रिय सौ. वैशालीताई अंड्रस्कर, त्रिवेणी काव्याच्या मुख्य मार्गदर्शक.. परीक्षक प्रिय वृंदाताई आणि सर्व सन्माननीय… आदरणीय प्रशासक, सहप्रशासक, परीक्षक.. संकलक… मार्गदर्शक… प्रिय सौ. स्वातीताई, प्रिय सुधाताई, प्रिय प्रतिमाताई,प्रिय तारकाताई,प्रिय शर्मिलाताई, आदरणीय श्री विष्णू दादा, संग्राम दादा, अरविंद दादा, अशोक दादा, विकास दादा, हंसराज दादा सर्व शिलेदार प्रशासकीय टीमचे मनःपूर्वक खूप खूप धन्यवाद. माझ्या “दवबिंदू ” सर्वोत्कृष्ट काव्यरचनेवर प्रेरणादायी, कौतुकपर अभिनंदनीय शुभेच्छा देऊन लेखणीचे बळ वाढविणाऱ्या सर्व सन्माननीय दादा ताईंचे मनःपूर्वक ऋणयुक्त खूप खूप धन्यवाद…!!!

राजश्री मिसाळ ढाकणे, बीड
शिक्षीका, कवयित्री, हायकूकारा
©सदस्या -मराठीचे शिलेदार समूह

3/5 - (2 votes)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 1 7 9 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
बातमी देण्यासाठी येथे क्लिक करा
12:37