बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये गरीब गरजू विद्यार्थीनींना सायकलींचे मोफत वाटप
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये गरीब गरजू विद्यार्थीनींना सायकलींचे मोफत वाटप
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
बिनधास्त न्यूज नेटवर्क
अलिबाग: (दि १४) सन २००० मध्ये भारत सरकारच्या पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले ‘द थिएटर ग्रुप मुंबईचे’ संस्थापक अॕलेक पदमसी यांनी अनेक इंग्रजी व हिंदी नाटकातून भूमिका साकारल्या आहेत. त्यांनी बुलंद भारत की बुलंद तस्वीर, हमारा बजाज ही जाहिरात केली होती, ती खूप प्रसिद्ध झाली होती. अनेक जाहिराती आणि काही चित्रपटांमध्ये सुद्धा त्यांनी भुमिका साकारल्या आहेत. गांधी चित्रपटात त्यांनी मोहम्मद अली जिना यांची भुमिका साकारली आहे. त्यांचा आवास येथे फार्म हाऊस आहे.
ॲलेक पदमसी हे अनेक वर्षे आवास सासवने धोकवडे रहिवासी हितवर्धक मंडळाच्या बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आवास मधील गरीब गरजू विद्यार्थिनींना त्यांच्या शिक्षणात खंड पडू नये, त्यांची शाळेत येण्याची गैर सोय होऊ नये या उद्देशाने सायकलींचे मोफत वाटप करत होते. त्यांच्या निधनानंतर त्यांचे मोफत सायकली वाटपाचे कार्य त्यांचे पुत्र क्वासार पदमसी, कन्या शाजान पदमसी व रायल पदमसी यांनी अविरतपणे पुढे सुरू ठेवले आहे.
दरवर्षी प्रमाणे यावर्षीही शनिवार दिनांक १४ मार्च २०२६ रोजी क्वासार पदमसी, शाजान पदमसी व रायल पदमसी यांनी विद्यालयातील दहा गरीब गरजू विद्यार्थीनींना सायकलींचे मोफत वाटप केले.
यामध्ये विद्यालयातील म्हात्रे प्रांजल हरेश [ इ.५ वी ], वरक आरोही बाबू [ इ.५ वी ], काठे तनिष्का समिर [ इ.६ वी ], नाखवा त्रिशा प्रदिप [ इ. ६ वी ], पाटील शुभ्रा दर्शन [ इ.७ वी ], म्हात्रे रिया रविंद्र [ इ. ८ वी अ ], पाटील सृष्टी राजेश [ इ.९ वी अ ], गुप्ता निसू राजू [ इ. ९ वी अ ], माने अक्षरा भिमराव [ इ.९ वी अ ], कोळी मयुरी शेकाप्पा [ इ.९ वी ब ], या गरीब गरजू विद्यायार्थीनींना मोफत सायकलींचा लाभ मिळाला.
सायकली वाटपाच्या कार्यक्रमा प्रसंगी सर्व प्रथम पदमसी कुटुंबियांचे मॕनेजर शशीकुमार नायर व संजय राणे यांचे संस्थेचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट जयंत चेऊलकर व सेक्रेटरी प्रभाकर म्हात्रे यांनी पुष्पगुच्छ देऊन यथोचित स्वागत केले.
या कार्यक्रमाप्रसंगी पदमसी कुटुंबियांचे मॕनेजर शशीकुमार नायर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
तसेच मुख्याध्यापक / प्राचार्य अनिल दारकुंडे सर यांनी विद्यालयाच्या व संस्थेच्या वतीने क्वासार पदमसी, शाजान पदमसी व रायल पदमसी यांनी मोफत सायकली वाटप केल्याबद्दल त्यांचे आभार मानले.
कार्यक्रमाला आवास सासवने धोकवडे रहिवासी हितवर्धक मंडळाचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट जयंत चेऊलकर, खजिनदार सुवर्ण कांबळी, सेक्रेटरी प्रभाकर म्हात्रे, उप सेक्रेटरी त्र्यंबक फाटक, कार्यकारिणी सभासद सुहास म्हात्रे, कार्यकारिणी सभासद दिपक राऊळ, कार्यकारिणी सभासद जयवंत म्हात्रे, कार्यकारिणी सभासद अनिल राऊळ, बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आवासचे मुख्याध्यापक / प्राचार्य अनिल दारकुंडे सर,
सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व सर्व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सांस्कृतिक समिती प्रमुख धनंजय भगत सर यांनी केले.



