नारंगी येथे आगरी समाज संस्थेचा उपक्रम
ग्रामपंचायतीच्या सहकार्याने उभारला जाणार मॉडेल प्रोजेक्ट
नारंगी येथे आगरी समाज संस्थेचा उपक्रम
ग्रामपंचायतीच्या सहकार्याने उभारला जाणार मॉडेल प्रोजेक्ट
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
बिनधास्त न्यूज नेटवर्क
अलिबाग (दि. २० सप्टेंबर २०२५): आगरी समाज संस्था, अलिबाग तर्फे रांजणखार, नारंगी येथे आज वृक्षारोपण व संवर्धन कार्यक्रमांतर्गत श्रमदान करण्यात आले. यावेळी जुलै महिन्यात केलेल्या वृक्षारोपणाचा आढावा घेऊन झाडांचे संरक्षण करण्यासाठी उभारलेल्या जाळी कंपाऊंडची पाहणी करण्यात आली.
आजच्या कार्यक्रमात तब्बल २०० बाबू झाडे लावण्यात आली. जुलै महिन्यात जी 188 फळझाडे लावली होती त्यांच्या सभोवती बांबूचे कंपाऊंड करण्यात आले आहे. हा प्रकल्प नारंगी ग्रामपंचायतीच्या सहकार्याने राबवला जात असून मॉडेल प्रोजेक्ट म्हणून याकडे पाहिले जात आहे. यासाठी कार्यक्षम सरपंच श्री. उदय म्हात्रे यांनी तातडीने सहमती दर्शवून सक्रिय पाठबळ दिले.
यावेळी आगरी समाज संस्थेतर्फे पुढील तीन वर्षे झाडांची निगा राखून ग्रामपंचायतीची स्वतःची रोपवाटिका तयार करून देण्याचा संकल्प सरपंच उदय म्हात्रे व प्रतिष्ठित आंबा व्यापारी डॉ. जगन्नाथ पाटील यांच्या सहकार्याने करण्यात आला. ग्रामस्थ नारंगी यांचेही योगदान उल्लेखनीय राहिले.
कार्यक्रमास आगरी समाज संस्थेचे अध्यक्ष निलेश पाटील, उपाध्यक्ष सुनिल तांबडकर, सेक्रेटरी प्रभाकर ठाकूर, सह-खजिनदार राजेंद्र पाटील, सौ. दिपश्री पाटील, बिपीन टेमकर, श्रेयस पाटील, मनोहर पाटील व नारंगी ग्रामपंचायतीचे सरपंच श्री उदय म्हात्रे आणि डॉ. जगन्नाथ पाटील हे उपस्थित होते.
वृक्षारोपणाने पर्यावरणाचा समतोल राखला जातो, पाणीधारणा वाढते व प्रदूषणावर नियंत्रण मिळते. झाडे ही पुढील पिढ्यांसाठी नैसर्गिक संपत्ती आहेत. अलिबाग परिसरात आगरी समाज संस्थेचा उपक्रम हा पर्यावरण संवर्धनाचा आदर्श व प्रेरणादायी नमुना ठरत आहे.





