Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजनचारोळीदादरा नगर हवेलीनागपूरपरीक्षण लेखपश्चिम महाराष्ट्रब्रेकिंगमहाराष्ट्रसंपादकीयसाहित्यगंध

अक्षरसम्राटांच्या निस्वार्थ मैत्रीचे खरे नाव ‘ग्रंथमैत्री’; प्रशांत ठाकरे

शनिवारीय 'काव्यस्तंभ' स्पर्धेचे काव्यपरीक्षण

0 4 8 2 8 2

अक्षरसम्राटांच्या निस्वार्थ मैत्रीचे खरे नाव ‘ग्रंथमैत्री’; प्रशांत ठाकरे

शनिवारीय ‘काव्यस्तंभ’ स्पर्धेचे काव्यपरीक्षण

महाराष्ट्रचं लाडकं व्यक्तिमत्त्व, ‘पु. ल. देशपांडे’ मैत्रीविषयी बोलताना म्हणतात, “रोज आठवण यावी असं काही नाही.. रोज भेट व्हावी असं काही नाही…. एवढेच कशाला..रोज बोलणं व्हावं असेही काही नाही.. पण…मी तुला विसरणार नाही आणि तुला याची खात्री असणे ही झाली मैत्री.” मीसुद्धा अशीच एक मैत्री जोपासलेली आहे. माझ्या या मित्राने मला कधीच फसवलं नाही,माझ्यासाठी ज्ञानार्जनाचा तो स्त्रोत आहे, तो सतत मला मार्ग दाखवतो. माझी विचारशक्ती विकसित करतो आणि माझं चारित्रही घडवतो. अर्थातच माझी मैत्री आहे ग्रंथांसोबत..!! माझ्या या निस्वार्थ मैत्रीचे खरे नाव ग्रंथमैत्री. अर्थात पुस्तकांसोबतच असलेला खराखुरा स्नेह.

स्वार्थहीन मैत्री जोपासणारे पुस्तक ना कधी खोटं बोलत, ना कधी कुणाला फसवत. सदैव सत्य तर सांगतेच, सोबत कधी मनाला शांत करते तर कधी विचारांना धारही लावते. कधी चारित्र्याला पावित्र्य प्रदान करते तर कधी ज्ञान, संस्कार व प्रगतीचा स्नेहबंध वृद्धिंगत करते. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश संपादन करण्याचं बळ ही पुस्तकेच देतात. म्हणून तर कधी कधी वाटतं या जगात लोकांशी बोलण्यापेक्षा पुस्तकांशी बोलणं किती सोपं असतं. संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात “वाचा ग्रंथ अमृताचे, समाधान मिळे चित्तासे” वाचन हे जीवनाचे दार उघडणारी कुंजी आहे आणि या कुंजीचा हळुवार स्पर्श म्हणजेच ‘ग्रंथमैत्री’ होय.

ग्रंथ हे कधी आपल्या दु:खावर फुंकर घालतात, कधी अंतर्मनातील प्रश्नांना उत्तरं देतात, तर कधी आपल्याला आपल्या अस्तित्वाशी पुन्हा एकदा जोडतात. “तिन्ही काळ व्यापून टाकणारे हे अक्षरसम्राट, माणसाच्या आयुष्याला नवे वळण देणारे मौनातील मौल्यवान मित्र आहेत.” या सुंदर ओळी ग्रंथमैत्रीचं महत्त्व अधोरेखित करतात.

“मैत्री ग्रंथाशी केली जिथे,
नसे काळ, नसे दु:ख तिथे.
शब्दांच्या सागरात मन डुंबते,
आणि जीवनाचं खरं सौंदर्य खुलते!”

अशी ही ‘ग्रंथमैत्री’ आज आठवण्याचे कारण म्हणजे, ‘शनिवारीय काव्यस्तंभ स्पर्धा’, मराठीचे शिलेदार समूहाचे सर्वेसर्वा आदरणीय राहुल सरांनी ‘ग्रंथमैत्री’ हा अनोखा विषय दिला. सर्वच समूहात सुंदर रचना आल्यात तेव्हा तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन. पुढील लिखाणासाठी सर्वांना शुभेच्छा.मला ही संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मराठीचे शिलेदार समूहाचे सर्वेसर्वा आदरणीय राहुल सरांचे मनापासून खूप खूप आभार…धन्यवाद..!!!

श्री.प्रशांत ठाकरे, सिलवासा
मुख्य परीक्षक/ लेखक
©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 2

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे