रूणूझुणू पैंजणाची
रूणूझुणू पैंजणाची माळ घालू का तुझ्या पायात ?
कुजबूज झाली सुरू आपल्या प्रेमाची गं बायात
पदर लावून तोंडाला खुदूखुदू हसतात गं गालात
कंबर लचकत चालणं तुझं त्या पैंजणाच्या तालात
रूणूझुणू पैंजणाची गं साऱ्या गावात चर्चा सुरू
डोळे मोडीत चालू नको माझ्या म्होरं गं तुरूतुरू
इश्काची चढली नशा नाहीच गं मन हे थाऱ्यावर
कोरीव लेणीवाणी काया पदर उडतोय वाऱ्यावर
प्रितझुला हलताच सखे होतो जीव खालीवर
कैक झाली गं घायाळ मदमस्त तुझ्या चालीवर
रूणूझुणू पैंजनाची लागलीय गोडी गं कानाला
जीव झुरणीला लागला उशीर नको गं दानाला
कन्यादान करताच रंगवू रात गं मधुचंद्राची
प्रेमाच्या मध्यान्ह रातीला हवा घाल पदराची
डोळे भरून गं पाहिलं,रूप तुझं गं नक्षत्रावाणी
तृप्तीचा ढेकर देताच डोळ्यांत गं आलं पाणी
चुंबनाच्या गं वर्षावानं भडकला वनवा अंगात
रूणूझुणू पैंजणाची नशा कशी आणते रंगात ?
संग्राम कुमठेकर
ता.अहमदपूर जि.लातूर
=========



