Breaking
अहमदनगरआरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजननागपूरपरीक्षण लेखपश्चिम महाराष्ट्रमराठवाडामहाराष्ट्र

नवरंगाची उधळण करीत सरला नवरात्रोत्सव; अनिता व्यवहारे

बिनधास्त न्यूज' व 'मराठीचे शिलेदार' समूहासाठी आभारीय शब्दफुले

0 4 8 3 0 0

नवरंगाची उधळण करीत सरला नवरात्रोत्सव; अनिता व्यवहारे

बिनधास्त न्यूज’ व ‘मराठीचे शिलेदार’ समूहासाठी आभारीय शब्दफुले

आनंदाचे डोही आनंद तरंग
पूर्ण झाले आज माझे स्वप्न रंग
दरवळला आज माझ्या स्त्री
मनातील रंगांचा गंध

मराठीचे शिलेदार समूहाच्या
बिनधास्त न्युज ने दिला तो आनंद
मी आभार मानावया घेऊन
आले नवरंगातील शब्दफुलांचे गंध

‘नवरंगाची उधळण करणारा शारदीय नवरात्रोत्सव नुकताच संपन्न झाला’. नवरात्रोत्सव हा तसे पाहता सर्वांसाठी एक आनंदाचा जल्लोषाचा उत्साह. ‘आदिशक्ती’ आदिमाया, आई जगदंबेचा अगाध महिमा या नवरात्र उत्सवात गायला जातो’. घराघरात नऊ दिवसांचा आणि विजयादशमीचा उत्सव साजरा करण्यासाठी स्वच्छता केली जाते. देवी चे घट बसवून उत्सव समारंभ साजरे केले जातात. यातून आम्हा स्त्रियांच्या वाटा जरा जास्तच. त्यामुळे या नऊ दिवसात जणू
“या देवी सर्वभूतेषु शक्ती रुपे न संस्थिता” आणि तीच शक्ती आमच्यात संचारते. नवरात्री बरोबरच नवरंगाची उधळण करण्याची संधी मिळते. नऊ दिवस नऊ रंगाचे वस्त्र परिधान करायचे वगैरे!

हे सर्व करीत असताना नऊ दिवसांत देवीची पूजा आरती,भक्ती या गोष्टी ही आम्ही तितक्याच भक्ती भावाने करत असतो. आज लाल उद्या पिवळा,परवा हिरवा हे रंग जरी आम्ही परिधान करतो तरी आमच्या स्त्री मनातही अनेक रंगांच्या छटा असतात. त्यात दया,माया, ममत्व, संवेदनशीलता इत्यादी, इत्यादी आणि हेच रंगांचे भाव विश्व उलगडण्याचा एक छोटासा प्रयत्न मी केला आणि आमच्या शिलेदार समूहात बिनधास्त न्युजचे व मराठीचे शिलेदार समुहाचे संस्थापक माननीय राहुल सर यांनी ते प्रसारित केले. त्यामुळेच तर अनेक वाचकांना आमच्या स्त्री मनातल्या या रंगांची कल्पना आली.

आपलं हे जग मुळीच एक रंगीत दुनिया. एका रंगाच्या हजार छटा असतात पण पुरुषांना मात्र या रंगां पैकी ठराविक रंगांचे आकर्षण असते.स्त्रियांना मात्र रंगाबरोबरच एका रंगाच्या हजार छटांची कल्पनातितओळख आणि आवड ही असते. एवढे रंग कमीच की काय म्हणून, आमच्या मनातले ही अनेक रंग आम्ही आमच्या वागण्या बोलण्यातून व्यक्त करतो. माणुसकीचा रंग व ममत्वाचा चा रंग इत्यादी. आणि तेच शब्दातून व्यक्त केले तेव्हा समूहातील सख्यांनी त्यावर दिलेल्या अनुभव, प्रतिक्रिया वाचून…

‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ असं म्हणून सुखवून गेल. सर्व वाचकांपर्यंत हे स्त्री मनातले रंग पोहोचवण्याचे श्रेय या शिलेदार समुहाच्या बिनधास्त न्यूज यांचेच आहे म्हणून या सर्व समूहासाठी मी शब्दसुमनांजली ची उधळण करीत बिनधास्त न्यूज आणि राहूल सर यांना धन्यवाद देते. माझ्या प्रत्येक लेखावर सुंदर सुंदर प्रतिक्रिया देत मला प्रेरणा व प्रोत्साहन देणाऱ्या सविताताई वैशालीताई, तारका ताई, स्वाती मराडे ताई, वंदनीय स्वाती तोंडे आई व समूहातील सर्व सदस्य या सर्वांना ही धन्यवाद देते..!

सौ. अनिता अनिल व्यवहारे
ता श्रीरामपूर जि अहिल्यानगर
सदस्य मराठीचे शिलेदार समूह

1/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 3 0 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे