गिरड – सिर्सी रोडवर कार आणि ट्रकचा भीषण अपघात
कार ड्रायवर जागीच ठार, बहीण व भाचा गंभीर जखमी
अखिल रोडे, शहर प्रतिनिधी
बिनधास्त न्यूज नेटवर्क
गिरड/ सिर्सी (दि २८): दिवाळी सणाच्या भाऊबीज निमित्त पाहुण्याची नातेवाईकाकडे ये – जा सुरू असते. दिवाळी निमित्त नातेवाईका कडून आपल्या राहत्या गावी परत प्रवास करतांना दिनांक २७/ १०/२०२५ गिरड – सिर्सी सॅटीस्टफॅक्शन बार जवळ ईरटीका कार क्र. एम.एच ३० ए झेड ५१९२ व गिरड मार्गे तनिस घेऊन जाणारा आयसर ट्रक क्र. एम.एच ३२ क्यू २३६२.यांच्यात रात्री ११ वाजता चे दरम्यान भीषण अपघात झाला.
प्राथमिक माहिती नुसार कारचालक हा तुळजापूर दर्शन घेऊन परतीचा प्रवास करून गावी परत जात असतांना हा अपघात झाला यामध्ये २४ वर्षीय कार चालक हिमांशू आत्माराम गोन्नाडे रा. आरमोरी जि. गडचिरोली यांचा जागीच मृत्यू झाला. तर सोबत असलेले वडील आत्माराम सोनाजी गोन्नाडे वय ५८ वर्ष बहीण शिवानी द्रोहित धकाते व भाचा एशित द्रोहीत धकाते वय दीड वर्ष हे गंभीर जखमी झाले. जखमींना पोलिस चौकी शिपाई ओंम राठोड यांनी सोबतच्या सहकार्याचा मदतीने खाजगी अँब्युलन्सने कस्तुरबा हॉस्पिटल सेवाग्राम येथे रवाना केले. कार आणि ट्रकच्या धडकेने कारचा समोरील भाग पूर्णपणे चेंदामेंदा झाला तर आयसर ट्रकचा समोरील चाक निघाला आणि कार त्यात घुसली.आयसर ट्रक चालक मोहम्मद रफीक मज्जिद शेख रा.अड्याळ ता.पवनी जि. भंडारा याला बेला पोलिस यांनी ताब्यात घेतले.
अपघाताचे प्रथमदर्शी हॉटेल कूक तेजराम श्रावण पडोळे यांनी सिर्सी पोलिस चौकीत अपघात बाबत माहिती दिली. माहिती मिळताच बेला पोलिस शिपाई ओंम राठोड यांनी होमगार्ड स्वप्नील पांडे, बोथलीचे पोलिस पाटील विजय गायगवाने, मनोरीचे पोलिस पाटील चिंटू धोंगडे व इतर सहकर्यासोबत घटनास्थळी धाव घेत अपघात व्यक्तींना हॉस्पिटल येथे रवाना करत मृत व्यक्तीला शव विच्छेदना करीता उमरेड येथे रवाना करण्यात आले. वाहतुकीत खोळंबा निर्माण होऊ नये यासाठी बेला पोलिस ठाणेदार चेतनसिह चव्हाण यांनी बंदोबस्त लावत वाहतूक सुरळीत करून जखमीची भेट घ्यायला कस्तुरबा हॉस्पिटल सेवाग्राम येथे गेले.
मृतक हिमांशू यांचे वडील माजी पोलिस कर्मचारी आहे. तुळजापूर येथून दर्शन घेऊन धराशिव येथे लहान बहिणीला पुणे करीता सोडून हिमांशू वडील आत्माराम आणि मोठी बहीण शिवानी आणि भाचा एशीत धकाते हे आरमोरी करीता जायला निघाले असता हा अपघात झाला.
उमरेड – गिरड रोड वर जिथे पहावं तिथे रोडची दुर्व्यवस्था:
या मार्गाने कोळसा ट्रक वाहतूक मोठ्या प्रमाणात होते त्यामुळे रोडची अवस्था दयनीय झाली आहे. रोड कडेला भरण नाही तर कुठे ब्रेकर ला रेडियम मार्किंग नाही. यामुळे रोड वर अपघात सत्र सुरूच आहे यावर प्रशासनाने गंभीर दखल घेत अपघाती मालिका थांबण्यास सहकार्य करावे अशी मागणी सिर्सी परीसरातून होत आहे.



