Breaking
ई-पेपरक्रिडा व मनोरंजननागपूरविदर्भसाहित्यगंध

क्रीडा क्षेत्र क्रीडापटूंसाठी, तर साहित्य क्षेत्र साहित्यिकांसाठीच हवे.

बिनधास्त न्यूज नेटवर्क

0 4 8 2 8 4

क्रीडा क्षेत्र क्रीडापटूंसाठी, तर साहित्य क्षेत्र साहित्यिकांसाठीच हवे.

साहित्य संस्थांच्या क्षेत्रात राजकारणी, व्यावसायिक, साहित्य क्षेत्राबाहेरील लोक नकोत.

बिनधास्त न्यूज नेटवर्क

नागपूर: (दि ४) विदर्भ साहित्य संघाच्या निवडणुकी संदर्भात एकीकडे विवेकी राजकीय नेतृत्व, ज्यांच्या नावाचा खोटारडेपणाने वापर आपल्या पदलालसेसाठी आणि वैयक्तिक व्यावसायिक हितासाठी, त्या नेतृत्वानेच एका राजकारणी, व्यावसायिक आणि अवाङ्मयीन उमेदवाराला अर्ज भरायला लावला असा करत आहेत तर दुसरीकडे तेच नेतृत्व मात्र त्यांचा या प्रकारांनी कोणत्याही प्रकारचा संबंध नसल्याचे सांगत उलट, राजकारणी, व्यावसायिक आणि साहित्य क्षेत्राबाहेरील लोक यांनी साहित्य संस्थेत कधीच हस्तक्षेप करू नये हे सांगत आहेत.

पर्यायाने विदर्भ साहित्य संघाच्या अध्यक्षपदी द्रष्टे, अनुभवी, प्रतिष्ठित वाङ्मयीन नेतृत्व असावे असेच सुचवीत आहेत. मात्र संबंधित उमेदवार व त्यांचे समर्थक यांचा खोटेपणा व हेतू उघड होऊनही त्यांच्या या भूमिकेचाही अव्हेरच करतील असेच सध्या तरी चित्र दिसत असून, त्यांच्या या विदर्भ साहित्य संघ विरोधी भूमिकेत बदल झाला नाही तर निवडणूक नुसती अटळच नव्हे तर विदर्भ साहित्य संघाची निवडणूक प्रथमच, राजकारणी, व्यावसायिक आणि साहित्य क्षेत्राबाहेरील लोक यांच्या हाती जावून,नगरपरिषद, ग्रामपंचायत निवडणुकी प्रमाणे त्यात संभवतात त्या सर्व राजकीय डावपेचांमध्ये अडकून भ्रष्ट होण्याचा धोका वाढून ठेवला आहे.

आपल्या लेखकांच्या, साहित्यिकांच्या असलेल्या विदर्भ साहित्य संघासाठी या संस्था तरी समाजातील आपल्या प्रतिभावंतांजवळच टिकल्या पाहिजेत.
त्या संस्थेच्या जागेवर पाडकाम, बांधकाम तेवढे करून कोट्यवधी रूपये कमवू इच्छिणाऱ्या व्यावसायिक, राजकारणी आणि साहित्य क्षेत्राबाहेरील लोक यांच्या ताब्यात देऊन आपलेच लोक त्या अवाङ्मयीन, राजकारणी, व्यावसायिकांना देऊन टाकणार अशी स्थिती निर्माण झाली आहे.ती टाळणे सभ्य, सांस्कृतिक समाजाचीही जबाबदारी आहे. सर्वोच्च न्यायालयाने देखील नुकतेच क्रीडा संघटनांच्या संदर्भातील एका याचिकेवर निकाल देताना त्या संस्था या केवळ क्रीडा क्षेत्रातील लोकांसाठीच असून राजकारणी, व्यावसायिक आणि क्रीडा क्षेत्राबाहेरील लोक त्यात असू नयेत अशा अर्थाचे निर्देश दिले असल्याचे कळते.

हेच तत्त्व आपल्या विभागीय साहित्य संस्थांनाही लागू आहे. या संस्थांपासून देखील राजकारणी, व्यावसायिक, साहित्य क्षेत्राबाहेरील लोक यांना दूरच राखले पाहिजे. त्यामुळे विदर्भ साहित्य संघाच्या अध्यक्षपदी द्रष्टे, वाङ्मयीन प्रतिभा व प्रतिमा आणि वाङ्मयीन प्रतिष्ठा असणाऱ्या, साहित्य संस्था चालवण्याचा प्रदीर्घ अनुभव असलेलीच व्यक्ती निवडून येईल हे विदर्भ साहित्य संघाच्या सदस्यांनी बघावे आणि विदर्भ साहित्य संघ वाचवावा असे आवाहन आम्ही करत आहोत. साहित्य संस्थांच्या क्षेत्रात राजकारणी, व्यावसायिक, साहित्य क्षेत्राबाहेरील लोक नकोत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे