Breaking
ई-पेपरकविताभंडाराविदर्भसाहित्यगंध

काव्यमंजिरी

वनिता गभणे आसगाव, जि.भंडारा

0 5 6 8 0 0

काव्यमंजिरी

भावनांना व्यक्त होण्यास
कुणीच ना मित्र होते..
या विराण जीवनाचे
उदासवाणे चित्र होते..

कामापुरता म्हणती मामा
असे स्वार्थाचे पुत्र होते..
दिखाव्यास नात्याचा मेळा
जिव्हाळ्यास ना गोत्र होते

सुख दु: ख वाढावे पुढ्यात
असे ना दयेचे पात्र होते..
एकाकी मनाला रिझविण्या
मग आले काव्यसूत्र होते..

भावनांना गुंफणे काव्यात माझे
जन नजरेत जरी विचित्र होते.
जीवनात सापडलेले हे मला
एकमेव मुक्त क्षेत्र होते..

हृदयमंदीरी फुलता काव्यमंजिरी
हर्षात ओले आज नेत्र होते..
कवितेच्या या रसगंधात
चैतन्यमय दिस – रात्र होते

वनिता गभणे
आसगाव, जि.भंडारा

5/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 6 8 0 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे