
0
5
6
8
0
0
माय बाप
माय बाप माझे
विठ्ठल रूखमाई सम भासे
तव चरणासी
पंढरपूर वसे
या धरावर असे तीर्थ
घर माझे पंढरपूर
माय बाप असे मुर्ती
पूजन करू तव चरण
छत्र छायेत मिळे सुख
चैतन्याची असे ज्योत
निर्गुण सगुण मिळे साक्षात्कार
ह्रदयी आनंद सदा तेवत
पुंडलिकासम होऊ सेवाव्रती
करू सेवा माय बापाची
विठ्ठल येई तव दारी
अभिलाषा पूर्ण होई दर्शनाची
नाम घेऊ मुखी विठ्ठलाचे
पावन होई तनमन अपुले
माय बाप विठ्ठल रुखमाई
वंदन करूया तव चरण कमले
पुरुषोत्तम ठोंबरे
झिंगाबाई टाकळी, नागपूर
===========
0
5
6
8
0
0


