0
4
8
2
9
7
रंग पंचमी
यमुना तीरी रास रंगला
गोप गोपी झाले गोळा
रंगांची उधळण करूनी
रंगे रंगपंचमी सोहळा
राधा ही गोरी हसरी
साज शृंगार शोभत
सुरंगीचे हे वळेसर
केशकलापी गंधित
शाम रंगात रंगली
राधिका हरिमय जाहली
निळ्या नभी रंग कवडसे
यमुना भक्तिरंगी रंगली
घुमे बासरी हरी अधरी
गोपगोपींसह कृष्ण मुरारी
खेळात रंग हो भरला
राधा जाहली रंगबावरी
निळ्या नभी हसे पौर्णिमा
रंगात भिजूनीया सरे द्वैत
पावले नाचती एक लयीत
राधा कृष्णाचे हेची अद्वैत
वृंदा(चित्रा)करमरकर
जि सांगली
===========
0
4
8
2
9
7



