0
4
8
2
9
4
तुझी साथ हवी
तू मनाच्या देव्हारी
हृदयात भाव…
भक्तीचा बगीचा
मुखी तुझे नाव…
तुझ्या सेवेचा धर्म
झिजने माझे…
तुझ्या नावाचं कुंकू
कपाळी हात तुझे
घासात तू श्वासात तू
नेत्री तुझ्या ज्योती
तुझ्या चरणी राया…
आरोग्याची आरती
तुझी साथ हवी
बघ हा अंतरीचा दिवा
माझे आयुष्य तुला लाभो
अन् मज मुक्ती मिळो!…
सिंधू बनसोडे
इंदापूर,जि.पुणे
================
0
4
8
2
9
4



